आता फेसबुक नोटिफिकेशन इन्स्टाग्रामवरही येणार!

आता लवकरच युजर्सना त्यांच्या इन्टाग्राम प्रोफाईलवर फेसबुकचे नोटिफिकेशनही पाहायला मिळणार आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे अॅप जगभरातील तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप फेसबुकनं विकत घेतलं, तेव्हापासून हे अॅप अधिकाअधिक कार्यक्षम करणं, तरुणांमधला त्याचा वापर वाढवणं यासाठी फेसबुक प्रयत्न करत आहे. इन्स्टाग्रामला टक्कर देणारेही अनेक अॅप सध्याच्या घडीला आहेत त्यामुळे फेसबुकसाठी स्पर्धा तीव्र आहे. त्यातून इन्टाग्रामपेक्षा अनेक चांगले फीचर्स काही अॅपनं देण्याचा प्रयत्न केल्यानं साहजिकच इन्स्टाची तरुणांमधली लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली आहे. म्हणूनच फेसबुकनं गेल्या वर्षभरात इन्स्टाग्रामसह, व्हॉट्सअॅपमध्येही काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

वाचा : शेजाऱ्यांच्या मदतीसाठी गुगलचे खास अॅप दाखल

आता लवकरच युजर्सना त्यांच्या इन्टाग्राम प्रोफाईलवर फेसबुकचे नोटिफिकेशनही पाहायला मिळणार आहे. काही रेडिट युजर्सनं या नवीन अपडेट्सबद्दल माहिती दिली आहे. फेसबुक नोटीफिकेशनच्या नव्या अपडेट्स सुरूवातील काही युजर्सपूरताच मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. पण लवकरच या अपडेट्स सर्व युजर्सच्या अकाऊंटवर उपलब्ध होणार आहे. जर युजर्सनं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला लिंक केलं असेल तर त्यांना फेसबुक संदर्भातल्या नोटीफिकेशन या इन्स्टाग्रामवर उपलब्ध होतील अशी माहिती फेसबुकनं दिली आहे.

वाचा : याहू मेसेंजर नव्हे; आता वापरा याहू स्क्विरल!

यापूर्वी इन्स्टा स्टोरीमध्ये फेसबुकनं महत्त्वाचे बदल केले होते. या अपडेटनुसार एखाद्या युजरनं आपल्या स्टोरीमध्ये मित्र- मैत्रिणीला टॅग केलं तर त्यांना ती इन्स्टा स्टोरी आपल्या अकाऊंटवर शेअरही करता येऊ शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook now start showing up notifications on instagram