Dressing Tips: कपड्यांची निवड नेहमी तुमच्या शरीराचा आकार लक्षात घेऊन केले पाहिजे. बहूतेक लोक इतरांना चांगले दिसणारे कपडे पाहून स्वत:साठी खरेदी करतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे. इतरांना कॉपी करण्याच्या नादात लोक स्टायलिश कपडे खरेदी करतात पण त्यांना ते चांगली दिसत नाही. म्हणूनच तुम्हाला तुमचा बॉडी शेप म्हणजेच शरीराचा आकार काय आहे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी ही गोष्ट तरी मनातून काढून टाका की बॉलीवूडच्या अभिनेंत्रीनी जो ड्रेस घातला जातो तो तुम्हालाही शोभेल. चला जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या बॉडी शेपवर कोणता ड्रेस चांगला दिसेल कारण अभिनेत्री त्यांच्या बॉडी शेप मेन्टेंन ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि आपल्या शरीराच्या आकारानुसार योग्य कपडे निवडतात.

कंबर रुंद असल्यास

अशा महिलांना त्यांचा आवडता ड्रेस घालण्यापूर्वी दहा वेळा आरशात पाहण्याची गरज नाही. त्यांनी असा ड्रेस घालावा, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा वरचा भागही उठून दिसेल, जेणेकरून लोकांचे लक्ष तुमच्या कंबरकडे जाणार नाही. अशा महिलांनी कोणत्याही ड्रेसमध्ये कंबरेला बेल्ट लावू नये. बेल्टमुळे शरीर दोन शरीर दोन भागांमध्ये विभागले जाते जे योग्य दिसत नाही. कंबरेपासून वर आणि कंबरेपासून खाली असे विभागल्यास शरीर आकारहीन दिसते.

Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

हेही वाचा – Business Idea: फक्त १० हजार रुपयांमध्ये सुरू करा टिकली बनवण्याचा व्यवसाय, लाखो रुपये कमावू शकता

उंची कमी असल्यास

सामान्य उंची पेक्षा कमी असलेल्या महिलांनी ड्रेस निवडताना खूप काळजी घ्यावी. शरीर पूर्णपणे झाकलेले कपडे घालणे टाळा. अशा ड्रेसेसमध्ये तुमची उंची कमी दिसते. लहान उंचीच्या महिलांसाठी फिटिंग आणि प्लेन दिसणारा ड्रेस सर्वोत्तम आहे. व्ही नेक या प्रकारच्या ड्रेसला आणखी खास बनवते. फ्रिल्स किंवा पफी स्लीव्हज असलेला ड्रेस कधीही घालू नका. हे लहान उंचीला देखील शोभत नाहीत.

हेही वाचा – महागडे स्क्रब खरेदी करण्याची गरज नाही, आता घरीच बनवू शकता Homemade Scrub, कसे ते जाणून घ्या

खांदे रुंद असल्यास

जर तुमचे खांदे रुंद असतील आणि खालचे पातळ शरीर असेल, तर अशा प्रकारच्या शरीरयष्टी असलेल्या महिलांनी खोल गळ्याचे कपडे घालणे टाळावे. खांद्यावर फ्रिल्स किंवा पफी स्लीव्हज असलेले कपडे खरेदी करणे टाळा. होय, तुम्ही रंगाचा प्रयोग करू शकता. या प्रकारची शरीरयष्टी असलेल्या महिलांनी दोन रंगाचे कपडे घालावेत. अशा आकृतीवर मध्यम लांबीचा ड्रेस चांगला दिसतो