फॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं ही तरुणांसाठी क्रेझ असते. सध्या असे ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांना “फॅशन सेन्स” आहे असेही संबोधले जाते. आधुनिक काळानुसार ही फॅशन बदलत असते. प्रत्येकाची आवड, गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते. कुठलाही ट्रेंड फॉलो करताना आपण बाजारात सुरु असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्त वापर करतो. या ट्रेंडमध्ये ओल्ड फॅशन किंवा फंकी लूक असं काही नसतं. सध्या तरुण पिढी सोशल मीडियाच्या साह्याने फॅशन ट्रेंड्स बद्दल अपडेट राहते. मागच्या ५ ते १० वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे. विशेष म्हणजे यात काही वर्षांपूर्वी ट्रेंडमध्ये असणारी फॅशन परत येत आहे. ६० च्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये ‘हिट’ ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे. फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या ‘लिवा’ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे. पाहूयात कशा आहेत या नवीन डिझाईन्स…
गडद रंगसंगती : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते, ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत आहे. सध्या पिवळा, ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स फॅशन इन आहेत .
निवड : कपडे घेताना आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टी यानुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे. या फ्लोरल प्रिंटमध्ये काहीसा ‘रेट्रो’ टच असल्याने आपण त्या काळातील फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आणू शकता.
मल्टिपल आऊटफिट्स : पूर्वी फक्त ‘वन पीस’ फ्रॉकपेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती. अशाचप्रकारे फिकट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट वेगळाच स्टायलिश लूक देऊन जातो.
वेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषांचे प्रिंट्ससुद्धा चर्चेत होते. आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे. पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ऑकेजनला अशा प्रिंटचे कपडे आकर्षक दिसतात.