Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नेहमीच सामान्य ठेवणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांच्या साखरेची पातळी दिवसातून दोनदा वाढते. काही लोकांमध्ये सकाळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी जास्त असते, तर काही लोकांमध्ये जेवल्यानंतर साखरेची पातळी जास्त असते. जेवणानंतर साखरेचे प्रमाण वाढणे स्वाभाविक आहे. कारण- आपले शरीर आपण जे काही खातो, ते लवकर ग्लुकोजमध्ये रूपांतरित करते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा आपण ब्रेड, भात, फळे, मिठाई किंवा इतर कोणतेही कार्बोहायड्रेट्सयुक्त अन्न खातो तेव्हा आपले शरीर ते पचवण्याची प्रक्रिया सुरू करते. पचनक्रियेदरम्यान, अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे विघटन होते आणि ते ग्लुकोजमध्ये बदलते. हे ग्लुकोज रक्ताद्वारे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांत पोहोचते आणि ऊर्जा म्हणून वापरले जाते. जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे.
फास्टिंग शुगर चाचणी सामान्यतः तुम्ही काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी सकाळी केली जाते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी निश्चित होते.
आहार तज्ज्ञ डॉ. विश्वरूप रॉय चौधरी म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांच्या उपवासातील साखरेचे प्रमाण कमी असले पाहिजे. परंतु २००५ मध्ये असे आढळून आले की, जगभरातील मधुमेहाच्या ५५ टक्के रुग्णांमध्ये उपवासातील साखरेचे प्रमाण जास्त आहे. असे लाखो रुग्ण आहेत, ज्यांची साखरेची पातळी रात्री २०० असते आणि सकाळी २५० होते. सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची चार मुख्य कारणे असू शकतात. फास्टिंग शुगर जास्त असण्याची कारणे काय आहेत आणि ती कशी नियंत्रित करता येईल ते जाणून घेऊया.
उपवासातील साखरेचे प्रमाण वाढण्याची कारणे कोणती?
इन्सुलिन रेझिस्टन्स हे फास्टिंग शुगरचे प्रमाण वाढण्याचे कारण असू शकते. जेव्हा शरीराच्या पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रक्तात साखर राहते. हे टाईप २ मधुमेहाचे मुख्य कारण आहे.
मधुमेही रुग्ण रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठतात किंवा त्यांना पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्यांच्या उपवासाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहते. पुरेशी आणि गाढ झोप न घेतल्याने हार्मोनल असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
ही प्रक्रिया सहसा पहाटे ४ ते ८ च्या दरम्यान होते.
रात्रीच्या जेवणात जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने किंवा रात्री उशिरा स्नॅक्स खाल्ल्याने उपवासात साखरेचे प्रमाण वाढू शकते.
उपवासातील साखर सामान्य ठेवण्यासाठी रात्री करा या ५ गोष्टी
तज्ज्ञांनी सांगितले की, जर मधुमेहाच्या रुग्णांच्या उपवासाच्या साखरेची पातळी सातत्याने १२६ mg/dL किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही ताबडतोब HbA1c चाचणी करून घ्यावी आणि तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवावे. उपवासातील साखरेचे प्रमाण सामान्य करण्यासाठी, रात्रीच्या जेवणात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या भाज्या खा. तुमच्या आहारात प्रथिने समाविष्ट करा. प्रथिनेयुक्त आहारात तुम्ही मसूर, पनीर, टोफू, अंडी किंवा चिकन खाऊ शकता. एक किंवा दोन चपात्या खा. लक्षात ठेवा की, ही चपाती रिफाइंड मैद्यापासून बनलेली असता नये.
जर उपवासातील साखरेचे प्रमाण जास्त राहिले, तर रात्री लवकर जेवण करा आणि जेवणानंतर फेरफटका मारा. तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या शरीराच्या हालचाली तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करतात. रात्री जेवणानंतर १०-१५ मिनिटे हलके फिरायला जा. जेवणानंतर चालण्याने पचनक्रिया सुधारतेच. त्याशिवाय उपवास आणि जेवणानंतरच्या साखरेची पातळीदेखील सामान्य राहते.
ताणतणाव नियंत्रित करा, तुमची साखरेची पातळी सामान्य राहील. ताण टाळण्यासाठी, आरामशीर राहा. शरीराला आराम देण्यासाठी ध्यान करा. खोल श्वास घ्या, पुस्तक वाचा, मोबाईल आणि टीव्हीवर कमी वेळ घालवा.
जर तुम्हाला तुमची उपवासातील साखर सामान्य ठेवायची असेल, तर तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे. रात्री ७-८ तासांची झोप तुमच्या उपवासातील साखर सामान्य करण्यास मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते आणि उपवासातील साखरेचे प्रमाण वाढते.