भारतातील गेमप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच झाला आहे. आजपासून हा गेम प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून अँड्रॉइड युजर्स तिथून हा गेम डाउनलोड करु शकतात. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. अखेर हा गेम आता उपलब्ध झाला आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे. अक्षयनेही ट्विटरद्वारे FAU-G लाँच झाल्याची माहिती दिलीये.
भारतीय सैनिकांवर आधारित :-
FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.
50 लाखांपेक्षा जास्त डाउनलोड :-
भारतीय युजर्समध्ये FAU-G हा गेम लाँचिंगआधीच लोकप्रिय ठरला आहे. लाँचिंगआधीच या गेमने गुगल प्ले स्टोअरवर जवळपास 50 लाखांहून जास्त प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केल्याची माहिती nCore गेम्सकडून देण्यात आली आहे.
Face the enemy. Fight for your country. Protect Our Flag. India’s most anticipated action game, Fearless and United Guards: FAU-G takes you to the frontlines and beyond! Start your mission today.
Download now: https://t.co/8cuWhoq2JJ#HappyRepublicDay #FAUG @BharatKeVeer pic.twitter.com/uH72H9W7TI
— Akshay Kumar (@akshaykumar) January 26, 2021
टक्कर कोणाला ?
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.