सणासुदीच्या काळात कुटुंबातील नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येत अनेक चविष्ट खाण्याचा आस्वाद घेत असतात. या भारतात प्रत्येक सणानुसार वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची एक प्रथा आहे, त्यामुळे प्रत्येक सणाला आपल्या घरी काही ना काही गोड, तिखट पदार्थ बनवले जातात. यात विशेषत: मिठाई खाण्यास सर्वाधिक पसंती दिली जाते. पण अनेकजण वजन वाढण्याच्या भीतीने गोड पदार्थ खाणे टाळतात. पण कितीही प्रयत्न करुनही सणासुदीच्या काळात शरीर फिट ठेवणे कठीण होऊन बसते. पण आम्हाला अशा काही सोप्या ५ टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सणासुदीच्या काळातही फिट आणि उत्साही राहू शकता.

सणासुदीच्या काळात फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

१) रोज व्यायाम करा

सणासुदीच्या काळात प्रत्येकजण खूप तयारी करत असतो. अशावेळी शेड्यूल खूप व्यस्त असते. पण फिटनेस राखण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासही मदत होते.

२) खाण्यावर नियंत्रण ठेवा

सणासुदीच्या काळाच खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकता पण जास्त खाऊ नका, खाण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन करणे टाळा.

३) मिठाई कमी खा

तुम्ही शुगर फ्री मिठाई खाऊ शकता किंवा गूळ आणि खजूरापासून बनवलेल्या मिठाई खा. साखरेपासून बनवलेल्या मिठाई कमी प्रमाणात खा. कारण यामुळे शरीरातील साखरेची पातळीही वाढते आणि वजनही

४) सकाळी हेल्दी ड्रिंक्स प्या

सणासुदीच्या काळात रोज सकाळी हेल्दी ड्रिंक्स प्यायला विसरु नका, यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) पुरेशी झोप घ्या

वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या. उत्साह टिकून ठेवण्यासाठी रोज ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.