How To Check Gas Level In Lpg Cylinder At Home: आपल्यापैकी बहुतेक जण अशा परिस्थितीतून जातोच जेव्हा आपण स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर संपतो. कधी कधी गॅस संपतो अशा वेळी तो लगेच भरणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे सिंगल गॅस कनेक्शन आहे, त्यांना खूप त्रास होतो. विशेषत: त्यावेळी अडचण होते जेव्हा गॅसवर अन्न शिजवायला ठेवलेले असते किंवा घरात पाहुणे आलेले असतात. तसे तर सामान्यतः आपण सिलेंडरचे वजन कमी झाले आणि गॅस लाल झाला तर त्याद्वारे तो संपत आला आहे हे ओळखतोच. एलपीजी सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज लावणे प्रत्येकासाठी सोपे नसते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे शोधण्यासाठी एक युक्ती सांगणार आहोत.
काही लोक सिलेंडर उचलतात आणि वजनानुसार त्यात उरलेला गॅस अंदाज लावतात तर काही लोक आगीच्या रंगावरून अंदाज बांधतात. परंतु यामध्ये हा अंदाज बरोबर असण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण स्टोव्हच्या बर्नरमधील समस्येमुळेही आगीचा रंग बदलू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅसची अचूक पातळी जाणून घेऊ शकता.
अशी ओळखा गॅसची लेव्हल
सिलेंडरमधील गॅसची लेव्हल तपासण्यासाठी त्याच्याभोवती एक ओला टॉवेल गुंडाळा. सुमारे १ मिनिट वाट पहावी लागेल. थोड्या वेळाने, गॅस टाकीचा पृष्ठभाग ओला झाला की टॉवेल काढून टाका. आता सिलिंडरचा किती भाग लवकर कोरडा झाला आणि किती भाग ओलाच आहे ते तपासा.गॅस सिलेंडर किती भरलेला आणि किती रिकामा आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्याचे ओले आणि कोरडे दोन्ही भाग काळजीपूर्वक पहावे लागतील. कारण त्याचा ओला भाग गॅस असल्याचे दर्शवतो आणि कोरडा भाग गॅस नसल्याचे दर्शवतो.स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये भरल्या जाणाऱ्या गॅसचे नाव एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) असते. म्हणजेच गॅसमध्ये काही प्रमाणात द्रव देखील असतो. अशा स्थितीत टाकीच्या कोणत्याही भागामध्ये गॅस असला तरी तो भाग ओला केल्यावर गॅसच्या थंडपणामुळे हळूहळू सुकतो. दुसरीकडे, रिकामा राहिलेला भाग उष्णतेमुळे जलद सुकतो.