5 Indoor Plants Give Maximum Oxygen: बोहो, मॉडर्न स्टाईलची तरुणाईला भुरळ पडू लागल्यापासून अलीकडे प्रत्येक घरात रोपट्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. अगदी प्रत्येकालाच छान बाल्कनीत बाग फुलवता आली नाही तरी काही निवडक रोपं ही आपणही आवर्जून घरी दारी लावायला हवीत. भारतीय संस्कृतीत झाडांना धार्मिक महत्त्व आहे. उदाहरणार्थ तुळस. तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय वनस्पती मानली जाते. त्यामुळे प्रत्येक दारात तुळशीचे स्थान अगदी जुन्या काळापासून अढळ राहिले आहे. पण फक्त तुळसच नव्हे तर आज आपण अशा ५ वनस्पती पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या आरोग्यरूपी धनसंपदेत वाढ होऊ शकते.

घरी- दारी असायलाच हव्यात ‘या’ आठ वनस्पती

१) स्पायडर प्लॅन्ट

स्पायडर प्लॅन्ट हे हवेतील कार्बन मोनॉक्साईड, बेन्झीन शोषून ऑक्सिजन बाहेर टाकते. त्यामुळे घरातील हवेत ऑक्सिजन टिकून राहण्यास मदत होऊ शकते.

२) स्नेक प्लॅन्ट

हवेतील घातक वायू शोषून त्याऐवजी हवेत ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे काम ही वनस्पती करते.

३) लिली

लिली या वनस्पतीमध्ये हवा शुद्ध करण्याची क्षमता असते. यामुळे घरातील वातावरण नेहमी ताजेतवाने वाटते. हवेतील घातक वायू जसे की बेन्झीन, झायलीन, toluene चे प्रमाण कमी करण्यासाठी या वनस्पतीची मदत होते.

४) मनी प्लॅन्ट

खऱ्या अर्थाने घरात पैशांची बचत करण्याचे काम मनी प्लॅन्ट करते. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणाऱ्या या वनस्पतीमुळे तुमच्याही घरात रोगराई फार टिकून राहणार नाही.

५) कोरफड

फर्निचरवर वापरलेले केमिकल, घराच्या स्वच्छतेसाठी वापरलेल्या डिटर्जंटमधील केमिकल नष्ट करून ऑक्सिजन वाढवण्याचे काम कोरफड करते. याशिवाय कोरफडीचे त्वचा, केस या दोन्हीच्या सौंदर्यासाठीचे फायदे तर सर्वांनाच माहित आहेत.

हे ही वाचा<< दरवाजे फुगून घट्ट झाल्यावर ‘हे’ उपाय वाचवतील पैसे; काही मिनिटात करा ‘हे’ ५ सोपे घरगुती जुगाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रोपं ठेवायची कशी आणि कुठे?

तुम्हाला जागेची अडचण असेल तरीही तुम्ही ही रोपं घरात आणू शकता याचे मुख्य कारण म्हणजे यासाठी मोठमोठ्या कुंड्या किंवा भांड्यांची गरज नाही. अगदी छोट्याश्या कुंडीत जरी तुम्ही ही रोपं लावून ठेवली तरी त्यांची वाढ उत्तम होते व ते ती ताजी राहतात. पहिले दोन पर्याय आपण घराच्या सजावटीसाठी सुद्धा हॉल, किचनमध्ये ठेवू शकता. तर कोरफड घराच्या बाल्कनीची शोभा वाढवू शकते, लिली तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवल्यास प्रसन्न वाटते तर मनी प्लॅन्टची वेल बाल्कनी, किचन व बाथरूम च्या भागात हँगिंग कुंड्या वापरून लावू शकता.