ग्राहकांनी आपले उत्पादन खरेदी करावे यासाठी कंपन्या अनेकदा विविध ऑफर्स जाहीर करत असतात. सध्या ऑनलाईन खरेदीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका क्लिकवर कोणतीही वस्तू आपण अगदी सहज खरेदी करु शकतो. फ्लिपकार्टवर सध्या तीन दिवसीय सॅमसंग फेस्टिव्हल सुरु असून यावर सॅमसंगच्या विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सॅमसंगच्या विविध मोबाईलवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅलक्सी एस 7 हा फोन तुम्ही केवळ २९ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनची किंमत ४६ हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला १६ हजार १० रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय एक्स्चेंज ऑफरमुळे हा फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 या ६४ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची मूळ किंमत ५७,९०० रुपये आहे. या फोनवर जवळपास २० हजार रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्सवर २ हजार रुपयांची सूट असल्याने हा फोन तुम्हाला १४ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येईल. गॅलक्सी ऑन 5 वर २५०० रुपये सूट देण्यात आली असल्याने हा फोन ६, ४९० खरेदी करता येईल. गॅलक्सी ऑन 7 हे मॉडेल ६,९९० रुपयांना, गॅलक्सी ऑन नेक्स्ट १३, ९०० रुपये, गॅलक्सी सी 9 प्रो २९,९०० रुपये, गॅलक्सी जे 7 हा फोन ९,७९० रुपयांना मिळणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flip kart samsung mobiles exciting offers on samsung mobile galaxy s7 is at rs
First published on: 09-11-2017 at 18:43 IST