शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. महागौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते.पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिव यांना त्यांचे पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले.ज्यामुळे त्याचे शरीर काळे झाले होते, भगवान शिवाने त्याच्यावर गंगेचे पाणी शिंपडून त्याला गोरा रंग दिला. तेव्हापासून देवीच्या या स्वरूपाला महागौरी म्हणतात. या वर्षी अष्टमीची तारीख १३ ऑक्टोबर, बुधवारी पडत आहे. या दिवशी देवीची पूजा करण्याबरोबरच ज्योतिष शास्त्राचे असे काही उपाय आहेत, ज्याद्वारे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काय आहेत ते उपाय जाणून घेऊयात.

उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही नवरात्रीच्या अष्टमीला देवीला लाल रंगाच्या कापडात नाणी आणि बताशे अर्पण करा. याद्वारे देवी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

महागौरी पूजेच्या दिवशी म्हणजे अष्टमीला कन्या पूजा करणे उत्तम मानले जाते. या दिवशी ९ लहान मुलींना बोलवून त्यांची पूजा करून त्यांना जेवायला द्या. यानंतर त्यांना छान असे लाल रंगाच्या भेट वस्तु द्या. अशाने देवी प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करेल.

अष्टमीच्या दिवशी सुवासिन स्त्रीला लाल रंगाची साडी आणि श्रुंगार भेट द्या. शक्य असल्यास चांदीचे नाणेही द्या, असे केल्याने तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी येईल आणि वर्षभर घरात पैसा राहील.

नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी तुळशीजी जवळ नऊ दिवे लावा आणि प्रदक्षिणा मारा. अशाने सर्व रोग आणि दोष घरातून नष्ट होतील आणि कुटुंबात आनंद वातावरण निर्माण होईल.

अष्टमीच्या या शुभ तिथीला तुम्ही पिंपळाची ११ पाने घेऊन त्यावर तूप सिंदूर सह भगवान रामाचे नाव लिहून त्यांची एक माळ बनवा. ही माळ तुम्ही हनुमान देवाला अर्पण करा. याने सर्व प्रकारची संकटे तुमच्या घरापासून दूर राहतील.

(टीप: वरील उपाय करताना तुम्ही या क्षेत्रातील ज्योतिष शास्त्र याचे सल्ले घ्या.)