Fruits and Vegetables How To Clean: पावसाळ्यात जीवाणू, जंतू व बुरशी यांची वेगाने वाढ होते. अशा परिस्थितीत भाज्या, फळे, तसेच त्यांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमार्फत रोगराई पसरण्याचाही धोका वाढतो. कारण- त्याद्वारे जीवाणू किंवा जंतूंचा शरीरात शिरकाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत अन्न विषबाधा, पोटदुखी, अतिसारर यांसारखे आजार टाळण्यासाठी पावसात फळे आणि भाज्या बाजारातून घरी आणल्यानंतर त्यांचा व्यवस्थित स्वच्छ करून वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- बऱ्याचदा फळे किंवा भाज्यांना चिकटून बसलेले जीवाणू फक्त पाण्याने धुऊन काढून टाकता येत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना निर्जंतुक करण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करा.
आधी हे काम करा
बाजारातून भाज्या किंवा फळे खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम भाज्या किंवा फळे पाण्याने स्वच्छ धुऊन ज्यामुळे त्यावरील घाण साफ होईल.
व्हिनेगरच्या पाण्याने धुवा
भाज्या आणि फळे व्हिनेगरच्या पाण्याने धुवा. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडेसे व्हिनेगर घ्या. हेही लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात व्हिनेगर वापरण्याने फळे किंवा भाज्यांची चव खराब होऊ शकते. त्यानंतर भाज्या किंवा फळे या पाण्यात सुमारे १५ मिनिटे भिजवा आणि नंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवा.
मिठाच्या पाण्यात घाला
कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली व पालक यांसारख्या भाज्यांमध्ये लहान कीटक लपलेले असतात. अशा परिस्थितीत त्यांना काढून टाकण्यासाठी मिठाचेपाणी वापरा. त्यासाठी पाणी थोडे कोमट करा. नंतर त्यात मीठ टाका आणि त्यात भाज्या भिजवा. नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
भाज्या जास्त दिवसासाठी साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा
अनेक वेळा धुतल्यानंतरही भाज्यावरील बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणून त्यांना नेहमी धुऊन वाळवल्यानंतर कापड किंवा कागदामध्ये स्टोअर करा. तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी त्यांना गरम पाण्यात भिजवून ठेवा.