सकाळी गरमा गरम वाफळता चहा प्यायल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का चहाच्या सेवनाबाबत काही चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. HealthHatch नावाच्या एक वेलनेस कंपनीने त्यांच्या इंस्टाग्रामवर चहा पिण्याच्या चुकीच्या सवयींबाबत सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहेत या चुकीच्या सवयी?

रिकाम्या पोटी चहा पिणे

रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे काही लोकांचा अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे पोट बिघडू शकते. सकाळी रिकाम्या पोटी, विशेषतः खूप गरम चहा पिणे आम्लपित्त वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे ऍसिड पेप्टिक डिसीज (acid peptic diseases) जसे की गॅस्ट्रिक(gastric), ड्युओडेनल अल्सर (duodenal ulcers ) किंवा इरोशन (erosions, ) इ. वाढू शकतात, असे हैद्राबादच्या यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, फिजिशियन, डॉ दिलीप गुडे यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

लक्षात ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. सकाळी चहा पिण्यापूर्वी काहीतरी खा मगच चहा प्यावा.

जेवताना चहा घेणे

जेवताना चहा घेतल्यास त्यातील टॅनिन आणि फायटेट्स शरीरातील लोह शोषण्यास अडथळा निर्माण करतात जे शरीरातील लोहाची पातळी कमी होण्यास किंवा अशक्तपणाला कारणीभूत ठरते. यावरून लोहयुक्त वैविध्यपूर्ण आहाराबरोबरच चहा पिणे नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आ
हे असे ”गुरुग्रामच्या नारायण हॉस्पिटल, हेपॅटोलॉजी आणि यकृत प्रत्यारोपणच्या सल्लागार आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ सुकृत सिंग सेठी यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

लक्षात ठेवा, जेवताना चहा पिऊ नये. सकाळी किंवा नाश्ता वेळी चहा प्यावा.

संध्याकाळी उशिरा चहा पिणे

संध्याकाळी उशिरा चहा पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना झोपण्या संबधीत त्रास होऊ शकतो. डॉ गुडे यांनी नमूद केले की, “चहामधील थिओफिलाइन्स हे उत्तेजक असतात आणि ते आपल्याला जागरुक ठेवतात आणि त्यामुळे रात्रीची झोप खराब होऊ शकते.”

लक्षात ठेवा , संध्याकाळी उशिरा चहा पिणे टाळा, झोपण्याच्या ६-८ तास आधी चहा पिणे टाळा

दररोज जास्त चहा पिणे

दररोज जास्त चहा प्यायल्याने अॅसिडिटी, झोपेचा त्रास, लोहाची पातळी कमी होणे, आतड्याचे आरोग्य बिघडते आणि कॅफीनचे सेवन वाढते. कोर्टिसोलची पातळी वाढते. डॉ गुडे यांच्या मते, “दिवसातून अनेकवेळा चहा प्यायल्याने हृदयविकाराचा वेग वाढलेल्यांना टॅचियारिथिमिया(tachyarrhythmias.) होऊ शकतो. जे अनेक वेळा चहा घेतात त्यांच्यामध्ये रक्तदाब चढउतार देखील सामान्य असतात.

लक्षात ठेवा, दररोज जास्त चहा पिणे टाळा, दिवसातून १ किंवा २ कप चहा घ्यावा.

प्लास्टिकची गाळणी वापरणे

गरम चहा प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्यावर प्लास्टिकमधून विषारी द्रव्ये (BPA) बाहेर पडू शकतात. बीपीए(BPA) हा एक ज्ञात endocrine disruptor आहे म्हणजेच शरीरात अनेक हार्मोनल बदल घडवून आणतो. डॉ गुडे यांनीही याबाबत सहमती दर्शवत सांगितले की, प्लॅस्टिक कप किंवा प्लॅस्टिक-लेपित डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया, स्तनाचा कर्करोग इत्यादी चयापचय विकारांचा धोका वाढून अंतःस्रावी व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

लक्षात ठेवा, चहा गाळण्यासाठी प्लास्टिकची गाळणी वापरू नका, प्लास्टिक कपमध्ये चहा पिऊन नका. त्यापेक्षा “स्टील किंवा पोर्सिलेनच्या डब्यात चहा पिणे केव्हाही चांगले, असे डॉ गुडे यांनी सांगितले.

चहामध्ये खूप साखर घालणे

जास्त साखर प्यायल्याने आपला एकूण उष्मांक वाढू शकतात आणि साखरेमध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. जास्त साखरेमुळे तुमच्या रक्तातील इन्सुलिन/ग्लूकोजची पातळी वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य परिस्थितींचा धोका असतो. डॉ गुडे यांच्या मते, “लोक चहाच्या सेवनाने त्यांच्या शरीराला किती कॅलरीज मिळू शकतात याकडे दुर्लक्ष करतात. “दिवसातून ३ वेळा जास्त प्रमाणात साखर घालू चहा प्यायल्यास त्यांना जास्त कॅलरीज मिळतात आणि या कॅलरीज पचवण्यासाठी त्यासाठी तेवढाच कठोर व्यायाम आवश्यक असतो,” असे डॉ गुडे म्हणाले.

लक्षात ठेवा, चहामध्ये तुम्ही किती साखर घालत आहात यावर नियंत्रण ठेवा/लक्षात ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ सुकृत पुढे सांगितले की “संयम, जेवणाबरोबर चहा घेताना सावधगिरी बाळगणे आणि चहा पिण्यासाठी योग्य भांडी निवडणे हे निरोगी चहा पिण्याचे दिनचर्या राखण्यासाठी महत्त्वाचे आहे.”