What Are The 10 Best Brain Foods : सतत एखादी गोष्ट विसरणे, कोणीतरी बोलत असताना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे यांमुळे बऱ्याचदा स्वतःबद्दल चिंता वाटू लागते. जेव्हा स्मरणशक्ती वाढवण्याचा आणि मन तीक्ष्ण ठेवण्याचा विचार येतो तेव्हा त्यावर उपाय काय करायचा, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण, तुम्हाला माहीत आहे का, भारतीय स्वयंपाकघरात हळदीपासून ते रात्री भिजवलेले कुरकुरीत बदाम स्मरणशक्ती आणि मन तीक्ष्ण ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, काही भारतीय पदार्थांमध्ये असे घटक असतात, ज्यामुळे शरीराला अँटिऑक्सिडंट्स, आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे व खनिजे पुरवणे, न्यूरॉन्सचे संरक्षण करणे, रक्तप्रवाह व एकाग्रता वाढवण्यास मदत करणे या गोष्टी साध्य होतात. हे आपल्या आजींना आधीपासून माहीत होते. तर, नक्की कोणते पदार्थ आहेत ते चला जाणून घेऊयात…
तर नक्की कोणते पदार्थ आहेत चला जाणून घेऊयात…
बदाम – आई नेहमीच अभ्यास लक्षात राहण्यासाठी भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला द्यायची. तर, रात्रभर भिजवून सकाळी बदाम खाणे हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले बदाम मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून सुरक्षित ठेवतात. त्यामुळे मानसिक त्रास कमी होतो आणि गोष्टी लक्षात राहतात….
अक्रोड – ब्रेन फूड म्हणून ओळखले जाणारे अक्रोड डीएचएने परिपूर्ण असतात, जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड पुरवतात. अक्रोडचे दररोज सेवन केल्याने लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती वाढणे आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.
हळद – हळदीत क्युरक्युमिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे शरीराला अँटिऑक्सिडंट्स पुरवणे, स्मरणशक्ती वाढवणे, सूज कमी करणे, मेंदूचे आजार कमी करणे आणि आनंदी वाटण्यासाठी मदत या गोष्टी साध्य होतात.
तूप – तूप हा पौष्टिक चरबीयुक्त पदार्थ आहे, जो मानसिक क्षमता वाढवतो आणि न्यूरोट्रान्समीटर (मेंदूचे) कार्य करण्यास मदत करते. डाळ किंवा पोळीबरोबर एक चमचा शुद्ध तूप खाल्ल्यास शरीर आणि मेंदू दोघांनाही पोषण मिळते.
आवळा – व्हिटॅमिन सी व अँटिऑक्सिडंट्स यांनी समृद्ध असलेला आवळा रक्तप्रवाह वाढवून आणि मुक्त रॅडिकल्सशी लढून मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारतो. आयुर्वेदाने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढविण्यासाठी आवळ्याची शिफारस फार पूर्वीपासून केली आहे.
पालेभाज्या (पालक, मेथी) – पालक व मेथीमध्ये फोलेट, व्हिटॅमिन के व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या पालेभाज्या मेंदूच्या कार्य सुरळीत चालू राहणे आणि वयोमानानुसार गोष्टी विसरण्याला दूर ठेवणे यांसाठी आवश्यक असतात.
काळे तीळ – आरोग्यदायी चरबी, अँटिऑक्सिडंट्स व खनिजांनी समृद्ध असलेले तीळ मज्जासंस्थेला पोषण देतात, स्मरणशक्ती वाढवतो. त्यामुळे तुम्ही काळ्या तिळाचे लाडू किंवा चटणी यांचा आहारात समावेश करू शकता.
साध्या बदामापासून ते आवळ्यापर्यंतचे अनेक पदार्थ मेंदू आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे नियमितपणे तुमच्या जेवणात त्यांचा समावेश करा आणि मानसिक शांतता, लक्ष केंद्रित करण्याचा तो एक नैसर्गिक मार्ग आहे.