दुधाच्या साईचे दही लावून ते घुसळून बनवलेल्या ताकापासून काढलेले लोणी प्रकृतीस हितकर असते. त्यात प्रामुख्याने ‘अ’, ‘ई’ आणि ‘ड’ जीवनस’त्त्वे असतात. इतर अँटिऑक्सिडंटस्देखील लोण्यात असून ते स्निग्ध गुणात्मक आहे. अजूनही भारतातील अनेक घरांमध्ये घरगुती पद्धतीने तूप तयार केले जाते. म्हणजेच लोण्यापासून तूप तयार केले जाते. घरी तयार केलेले देशी तूप हे स्वादिष्ट तर असतेच तसेच ते भेसळमुक्तही असते. दही घुसळून त्याचे ताक बनविताना वर लोण्याचा थर जमा होतो. जे ताजे लोणी अत्यंत मृदू असते, ते लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदतशीर असते. तसेच गाय, म्हैस व बकरी या सर्वांपासून बनविलेल्या लोण्यापैकी गायीचे लोणी उत्तम गुणधर्माचे असते.

मात्र तुम्हाला घरी तूप तयार करण्यासाठी लोणी साठवून ठेवावे लागते. खूप दिवस लोणी साठवून ठेवल्यामुळे त्याला एक प्रकारचा वास येऊ लागतो. तसेच लोण्यावर हिरव्या आणि गुलाबी रंगाची बुरशी देखील येऊ लागते. या सर्व समस्या टाळण्यासाठी लोणी साठवण्याची योग्य पद्धत समजावून घेणे आवश्यक आहे. आज आपण लोणी खूप दिवस कसे साठवून ठेवता येऊ शकते याबद्दलच्या काही सोप्या टिप्स जाणून घेउयात.

हेही वाचा : Fenugreek Benefits: मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

स्टीलचे पातेले

घरच्या घरी तूप तयार करण्यासाठी जर का तुम्ही लोणी साठवून ठेवत असाल तर ते योग्य प्रकारच्या भांड्यामध्ये साठवणे आवश्यक असते. यासाठी स्टीलची भांडी हा एक चांगला पर्याय आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये लोणी साठवून ठेवल्यास ते चांगले राहू शकते. इतर कोणत्याही भांड्यामध्ये ठेवल्यास लोणी जास्त काळ चांगले राहू शकत नाही.

भांड्यावर तूप लावावे

तुम्ही जर का तूप हे तुमच्या घरीच तयार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला लोणी साठवून ठेवावे लागते. वर पाहिल्याप्रमाणे लोणी स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ चांगले राहू शकते. तसेच जर का ज्या भांड्यात लोणी साठवून ठेव्याचे आहे त्याच्या आतील भागास तूप लावावे. म्हणजे लोणी जास्त काळ ताजे देखील राहते आणि जास्त काळ टिकते सुद्धा.

हेही वाचा : Kitchen Hacks: भाजीत मीठ जास्त पडलंय? गोंधळून जाऊ नका; ‘या’ टिप्स वापरा!

फ्रिजरमध्येच स्टोअर करावे

जर का तुम्हाला लोणी हे दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवायचे असेल तर ते तुम्ही फ्रिजरमध्ये स्टोअर करावे. फ्रिजरमध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि लोणी देखील सुरक्षित राहते. तसेच लोणी साठवण्यासाठी नेहमी झाकण असलेले भांडे निवडावे. अशा भाड्यांमध्ये लोणी ठेवल्यास त्याला आजूबाजूच्या वस्तूंचा वास लागत नाही व बॅक्टेरिया देखील दूर राहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)