How to Check Soil Moisture: तुम्ही कितीही गार्डनिंग एक्स्पर्ट असलात तरी कधी ना कधी झाडाला पाणी द्यायचं की नाही याबाबत शंका येतेच. माती ओलसर आहे की कोरडी, झाडाला पाणी हवंय की नाही, हे समजण्यासाठी हात मळवणं किंवा महागडं उपकरण वापरणं गरजेचं नाही. आता एका छोट्या, पण स्मार्ट ट्रिकद्वारे तुम्ही सेकंदात जाणून घेऊ शकता तुमच्या झाडाला तहान लागली आहे का? या गार्डनिंग हॅकमुळे मिळेल तुम्हाला तुमच्या बागेची तब्येत सुधारण्याचा नवा अनुभव आणि झाडं राहतील सदैव ताजी…
पावसाळ्यात झाडांना पाणी द्यावं की नाही, हा प्रश्न अनेकदा गोंधळात टाकतो. कधी कुंडीत पाणी जास्त होतं, तर कधी झाडं तहानलेली राहतात. मग असा काही सोपा उपाय आहे का, ज्यानं हात मळवण्याचीही (हात खराब न करता) गरज नाही आणि काही क्षणांत कळेल की, झाड पाणी मागतंय की नाही? होय! एक छोटा; पण जबरदस्त गार्डनिंग हॅक तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्यानं तुम्ही सहज जाणून घ्याल की कुंडीतील माती किती ओलसर आहे आणि झाडाला पाणी द्यायचं की नाही ते.
काय करायचं?
- एक स्वच्छ चॉपस्टिक किंवा बारीक बांबूची काठी घ्या. ती फिकट रंगाची असावी, जेणेकरून ओलावा सहज दिसेल.
- काठी कुंडीतील मातीमध्ये अगदी तळापर्यंत सरळ घाला.
- काही सेकंद थांबा, हलकेच फिरवा आणि बाहेर काढा.
पाहून घ्या रहस्य
- जर काठी पूर्ण कोरडी व स्वच्छ आली, तर माती कोरडी आहे म्हणजे झाड तहानलेलं आहे.
- जर काठी ओली झाली किंवा माती चिकटली, तर अजून पाणी देण्याची गरज नाही.
- काठीवर फक्त वरचा भाग कोरडा आणि खालचा भाग ओला असेल, तर पाणी देऊ नका. पण जर अर्ध्यापेक्षा जास्त भाग कोरडा असेल, तर लगेच पाणी द्या.
कोणत्या झाडाला किती पाणी?
- सुक्युलेंट्स – माती पूर्ण कोरडी होईपर्यंत पाणी देऊ नका.
- तुळस, टोमॅटो – माती अर्धी कोरडी झाली की पाणी हवं असतं.
या ‘चॉपस्टिक टेस्ट’द्वारे तुम्हाला मातीचा खरा ओलावा कळेल. महागडी उपकरणं, हात मळवायची त्रासदायक वेळ किंवा अंदाज बांधण्याचा धोका नाही. फक्त एक साधी काठी आणि काही सेकंदांत आणि रहस्य उघड तुमचं झाड पाणी मागतंय का नाही.
येथे पाहा व्हिडीओ
आता पावसाळ्यात झाडं ओलसरपणामुळे सडू देऊ नका आणि तहानलेलीही राहू देऊ नका. हा सोपा उपाय तुमच्या बागकामाचा अनुभव बदलून टाकेल.