How to Make Mogra Bloom: संध्याकाळी अंगणभर दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध आणि त्याच्या पांढऱ्या पाकळ्यांचा देखणा बहर हे कोणाला आवडणार नाही? मोगरा फुलाचा (Mogra Flower) सुगंध खूप मनमोहक असतो आणि तो खूप आकर्षकदेखील दिसतो. घरात मोगरा लावल्याने वातावरण सुगंधित होते. अनेक जण घराच्या बाल्कनीत, टेरेस गार्डनमध्ये आवडीने इतर फुलझाडांसह मोगऱ्याचं रोप लावतात. पण, कधी कधी मोगऱ्याचं रोप लावूनही त्यावर फूल येत नाही. त्यांची पाने, कळ्या सुकून जातात, ज्यामुळे तो कोमेजून जातो. पाणी, सूर्यप्रकाश दिला तरी काही फायदा होत नाही आणि मनात प्रश्न येतो “अखेर फुले का येत नाहीत?”
तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मोगऱ्याच्या रोपाचा बहर अचानक कमी झाल्याने काय करावे समजत नाही. पण, काळजी करू नका. मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपाय घेऊन आलो आहोत. घरच्या घरी मिळणाऱ्या काही साध्या गोष्टी मोगऱ्याच्या मुळाशी टाकल्यास तो फुलांनी लदबदून जाईल! खर्च जवळजवळ नाही, पण परिणाम जबरदस्त. कोणत्या गोष्टी मोगराऱ्याच्या रोपांसाठी वरदान ठरू शकतात, जाणून घेऊया…
‘या’ ५ गोष्टींनी मोगऱ्याचं रोप बनेल फुलांनी गच्च; कचरा होईल खजिना
१. लसूण पाणी : फुलांसाठी जादुई टॉनिक
लसणात असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण मातीला पोषण देतात. ३-४ लसणाच्या पाकळ्या ठेचून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी ते पाणी गाळून मोगऱ्याच्या मुळाशी ओता. काही दिवसांत फरक जाणवेल.
२. डाळीचं पाणी : घरचं नैसर्गिक खत
डाळ धुताना जे पाणी निघतं ते कधीही वाया घालवू नका. ताजं डाळीचं पाणी थेट मोगऱ्याच्या मुळाशी टाकल्याने झाडाला भरपूर पोषण मिळतं आणि कळ्या फुटायला लागतात.
३. लाकडाची राख : पोटॅशियमचा स्रोत
थोडीशी लाकडाची राख मोगऱ्यासाठी उपयुक्त असते, पण जास्त प्रमाण हानिकारक ठरू शकतं. काळजीपूर्वक मुळाशी टाका.
४. तांदळाचं पाणी : गुपित पोषण
तांदूळ धुताना जे पाणी निघतं, ते पातळ करून मोगऱ्याच्या मुळाशी टाका. हे पाणी झाडाच्या वाढीस आणि फुलांच्या उमलण्यास मदत करतं.
५. आंबट ताक : नैसर्गिक फर्टिलायझर
१५-२० दिवसांच्या अंतराने पातळ आंबट ताक मोगऱ्याच्या मुळाशी टाकल्यास झाडाची फुलं येण्याची क्षमता वाढते.
माळ्यांचा सल्ला : कोणतेही नैसर्गिक खत १५-२० दिवसांच्या अंतरानेच वापरा. जास्त प्रमाणात खत वापरल्यास झाड खराब होऊ शकतं.