Garlic Milk Benefits: आपली पचनसंस्था आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे कार्य करते. ही सिस्टीम केवळ पचनासाठीच जबाबदार नाही, तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर, मानसिक आरोग्यावर आणि एकूणच शरीरावर महत्त्वपूर्ण परिणाम करते. मात्र, बैठी जीवनशैली आणि फास्ट फूडच्या सेवनामुळे आपली पचनशक्ती धोक्यात आली आहे. पोट फुगण्यापासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत अनेक त्रास स्त्री पुरुष दोघांना आणि प्रत्येक वयोगटातील लोकांना सहन करावे लागत आहेत.

सक्रिय जीवनशैली पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यात मोठी भूमिका बजावू शकते, पण निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी शरीराला पोषण मिळणे हे ही तितकेच आवश्यक आहे. पचन सुधारण्यासाठी अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत जे तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट करू शकता. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ रेखा राधामोनी यांनी इंस्टाग्रामवर दाव्यासहित असा एक उपाय शेअर केला आहे जो सर्व पचन समस्या सोडवू शकतो. हा उपाय म्हणजे लसूण दुध.

आयुर्वेदात लसणाला अन्नापेक्षा औषध मानले जाते. तर दुधाचे महत्त्व आपण सर्वच जाणून आहोत. डॉ राधामोनी यांनी सांगितल्याप्रमाणे, “गॅस, फुगणे, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, हृदयविकार आणि संधिवात असलेल्या रुग्णांसाठीही हे दूध अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पण हे एक औषध आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याचे दररोज सेवन करू नका. काही दिवस वापरा आणि बंद करा. साठवू नका आणि नंतर वापरू नका.”

साहित्य

*लसूण- 5 ग्रॅम
*दूध – ५० मिली
*पाणी- ५० मिली

कृती

  • दूध आणि पाण्यात लसूण पेस्ट घाला.
  • दूध उकळून ५० मिली पर्यंत कमी होईपर्यंत उकळा.
  • दिवसातून दोनदा जेवणानंतर १० मिली गाळून प्या.

विजयवाडा येथील मणिपाल हॉस्पिटलच्या सिनियर डायटीशियन, स्वाती सांगतात की, “लसणाचे दूध हे लसणाच्या संभाव्य अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे, पाचक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे गुणधर्म हानिकारक जीवाणू किंवा बुरशीमुळे होणारे काही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन्सचा सामना करण्यास मदत करू शकतात. मात्र लसूण दुधाचे पाचन आरोग्यावर होणारे परिणाम तपासणारे वैज्ञानिक अभ्यास मर्यादित आहेत आणि हे दावे प्रमाणित करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

“त्याशिवाय, लसणाचे दूध हे ऍलिसिन सारख्या संयुगांमुळे रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे, श्वसन सुधारण्यास मदत करते, सर्दी आणि दमा कमी करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत आणि कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांसारखे आवश्यक पोषक घटक प्रदान करतात, जे एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. “

हे ही वाचा<< एक महिना दारू पूर्ण बंद केल्यास काय होते? रोज किंवा क्वचितही मद्यपान करत असाल तर तज्ज्ञांचं उत्तर नक्की वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लसणाचे दूध सामान्यत: सुरक्षित मानले जात असले तरी, आहारतज्ज्ञांनी सांगितले की ज्यांना लसणाची लॅक्टोजची ऍलर्जी आहे त्यांनी लसणाचे दूध पिणे टाळावे. याविषयी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.