आनुवंशिक त्वचारोगाने पीडित एका मुलावर शास्त्रज्ञांनी जनुकीय सुधारित पेशीच्या मदतीने तयार केलेली त्वचा प्रत्यारोपित करीत यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. हा मुलगा एपिडर्मोलिसिस बुलोसा या प्राणघातक आनुवंशिक त्वचारोगाने पीडित होता. या रोगामुळे त्याच्या त्वचेचा बाह्य थर सुमारे ८० टक्के नष्ट झाला होता. इतर उपचारपद्धती अपयशी ठरल्यानंतर जर्मनीतील रुहर-युनिव्हर्सेट बोचूम आणि इटलीतील मोडेना विदय़ापीठ येथील शास्त्रज्ञांनी प्रायोगिक उपचारपद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. जनुकीय सुधारित पेशींपासून तयार केलेली त्वचा जखमांवर प्रत्यारोपित करण्यात आली. दोन वर्षांच्या उपचारांनंतर हा मुलगा आता सामान्यपणे त्याचे दैनंदिन जीवन जगत आहे. एपिडर्मोलिसिस बुलोसा हा जन्मजात त्वचारोग असून या रोगावर यशस्वीरीत्या उपचार करण्याची पद्धती विकसित करण्यात अदय़ाप यश आले नाही. हा रोग असलेल्या रुग्णांच्या शरीरात त्वचा पुनíनर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने तयार करणाऱ्या जनुकांमध्ये बिघाड असतो. यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचा किरकोळ तणाव आल्यास त्वचेवर जखम, फोड येत त्वेचेला नुकसान होत अंगावर चट्टे तयार होतात. रोगाच्या तीव्रतेनुसार शरीराच्या अंतर्गत अवयवांवर देखील या रोगाचा परिणाम होऊ शकतो. सातवर्षीय हसनला कॅथोलीस्केश क्लिनिकूम बोचूम येथे २०१५ मध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्या बाहय़ त्वचेचा थराचे (इपिडरमिस) ६० टक्के नुकसान झाले होते. उपचारादरम्यान त्याच्या हाता पायावर, पाठ, पोट, मान आणि चेहऱ्यावर त्वचा प्रत्यारोपित करण्यात आली. सुमारे ०.९४ चौ.मी. जनुकीय सुधारित पेशीद्वारे तयार केलेली त्वचा रुग्णाच्या एकूण ८० टक्के शरीरावर प्रत्यारोपित करण्यात आली, असे प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख सल्लागार टोबीस हिर्श यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genetic treatment effective on skin disease
First published on: 12-11-2017 at 01:19 IST