जगात सर्वाधिक काळ सुरू असलेला वाढदिवस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच एका जर्मन व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली. या व्यक्तीचे नाव स्वेन हॅग्मेईर असून त्यांनी सलग ४६ तास स्वत:च्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. यादरम्यान, स्वेग हे विमानातून विविध देशांमध्ये प्रवास करत आपल्या वाढदिवसाची मजा लुटत होते. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसाच्यावेळी स्वेग यांनी हा विक्रम केला होता . त्यांनी ऑकलंडमधून (न्यूझीलंड) आपल्या प्रवासाची सुरूवात केली. त्यानंतर ब्रिस्बेन(ऑस्ट्रेलिया), होनालुलू (हवाई) असा प्रवास करत त्यांनी या अविस्मरणीय विक्रमाची नोंद केली. यापूर्वी कराचीतील नर्गिस भीमजी यांच्या नावावर सर्वाधिक काळ वाढदिवस साजरा करण्याचा विक्रम जमा होता. मात्र, स्वेग यांना आता तो मोडीत काढला आहे. नर्गीस भीमजी यांनी १९९८मध्ये ३५ तास २५ मिनिटे इतका वेळ स्वत:चा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी नर्गीस भीमजी यांनी कराची, सिंगापूर आणि सॅनफ्रान्सिस्को असा प्रवास केला होता.
स्वेग यांनी आपल्या दोन दिवसांच्या विमानप्रवासादरम्यान, विमानातील खाण्यापिणाचा आणि सुविधांचा यथेच्छ उपभोग घेतला. तसेच लांब अंतराचा विमानप्रवास कशाप्रकारे आरामदायी करावा, याबद्दल स्वेग यांना बरेच शिकायला मिळाल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सांगण्यात आले. स्वेग यांनी आपल्या विक्रमाबद्दल बोलताना, ही माझ्या वाढदिवसाची आजपर्यंतची सर्वात अविश्वसनीय भेट असल्याचे सांगितले. स्वेग यांचा गेल्यावर्षीचा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा झाला असला तरी, त्यांनी यंदाचा वाढदिवस आपल्या कुटुंबाबरोबरच अत्यंत खासगी पद्धतीने साजरा केला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
गिनीज बुकमध्ये ४६ तास सुरू असलेल्या वाढदिवसाच्या विक्रमाची नोंद
जगात सर्वाधिक काळ सुरू असलेला वाढदिवस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच एका जर्मन व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली.

First published on: 08-08-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German man sets guinness record for longest birthday ever