गोदरेज इंटेरिओ या भारताच्‍या फर्निचर सोल्‍यूशन्‍स देणा-या आघाडीच्‍या ब्रॅण्‍डने खास नवीन संशोधन अहवाल ‘सामाजिक भांडवालाचा वापर’ सादर केल्‍याची घोषणा केली. हा अहवाल आजच्‍या युगातील कामाच्‍या ठिकाणी येणारी आव्‍हाने व त्‍यावरील उपायांबाबत माहिती देतो. एओन हेविटचे संचालक अजित नायर आणि एडिफिस आर्किटेक्‍ट्सचे कार्यकारी संचालक रवी सारंगन यांसारख्‍या क्षेत्रातील दिग्‍गजांनी अहवाल सादर केला. या अहवालामध्‍ये भारतातील १००हून अधिक कंपन्‍यांची मते आहेत. मुंबईतील फोर्ट येथील गोदरेज इंटेरिओचे नवीन सोशल ऑफिस एक्‍स्‍परिअन्‍स सेंटर येथे हा अहवाल सादर करण्‍यात आला.

कामाच्‍या स्‍वरूपात कशाप्रकारे परिवर्तन होत आहेत आणि तरूण कर्मचारी कामाच्‍या ठिकाणाला अस्‍सल ‘वर्क हब्‍स’मधून ‘सोशल हब्‍स’मध्‍ये कशाप्रकारे रूपांतरित करत आहेत, याबाबत अहवालाने माहिती सांगितली. असे आढळून आले की, सध्‍याच्‍या भारतीय कर्मचा-यांमध्‍ये ४६ टक्‍के नवीन पिढीचे युवा आहेत आणि ते तीन प्रकारच्‍या कामाच्‍या ठिकाणांना पसंती देतात – फोकस, आरामदायी आणि सहयोगात्‍मक.

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

गोदरेज इंटेरिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथुर म्‍हणाले, ”गोदरेज इंटेरिओ संशोधन अहवालातून आढळून आले की, जवळपास २९ टक्‍के भारतीय कर्मचा-यांना सहयोगात्‍मक कामाचे ठिकाण असण्‍याची गरज वाटली आणि १५ टक्‍के कर्मचा-यांनी कार्यालयामध्‍ये त्‍यांना आरामदायी तसेच उत्‍साहित वाटेल अशा कामाच्‍या ठिकाणांना पसंती दिली. तसेच जवळपास ६१ टक्‍के कर्मचा-यांनी गरजेच्‍यावेळी विनाव्‍यत्‍यय कामावर लक्ष केंद्रित करता येईल अशा ठिकाणाची गरज देखील व्‍यक्‍त केली. यापैकी ५६ टक्‍के कर्मचारी म्‍हणाले की, सध्‍या त्‍यांच्‍या कार्यालयांमध्‍ये अशा ठिकाणांचा अभाव आहे. ही माहिती लक्षात घेत आम्‍ही ‘सोशल ऑफिस’ची संकल्‍पना तयार केली. कामाचे ठिकाण कर्मचा-यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करणारे असले पाहिजे. आजच्‍या आधुनिक युगातील कर्मचा-यांची कामाची पद्धत वेगळी आहे आणि त्‍यांना कामावर लक्ष केंद्रित करता यावे याकरिता कामाच्‍या ठिकाणी उत्‍तम सुविधा असल्‍या पाहिजेत. या कर्मचा-यांच्‍या वैयक्तिक अपेक्षांची पूर्तता करणा-या कामाच्‍या ठिकाणांमुळे त्‍यांना कामावर लक्ष केंद्रित करण्‍यामध्‍ये मदत होईल.”

ते पुढे म्‍हणाले, ”बैठेकाम करण्‍याची शैली, तसेच कामाच्‍या ठिकाणी कामाचे अधिक तास यामुळे कर्मचा-याच्‍या आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. सोशल ऑफिस कर्मचा-यांचे आरोग्‍य व उत्‍पादनक्षमता यामधील प्रत्‍यक्ष दुवा समजते आणि कर्मचा-यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याला साह्य करणा-या वातावरणाची निर्मिती करते.”

सोशल ऑफिसची खासियत त्‍याच्‍या विविधतेमध्‍ये आहे. सोशल ऑफिस कामाच्‍या वातावरणांचे विविध प्रकार ‘मी’ आणि ‘वुई’ यांच्‍यामध्‍ये योग्‍य संतुलन देते. कर्मचारी त्‍यांच्‍या कामाच्‍या पद्धतीप्रमाणे यांचा वापर करू शकतात. सोशल ऑफिस सहयोग व चिंतनाला प्रोत्‍साहन देण्‍यासोबतच गोपनीयतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेली खासगी बैठक क्षेत्रे आणि शांतता क्षेत्रांची सुविधा व विनाव्‍यत्‍यय काम अशा सुविधा देते. ज्यामुळे कर्मचारी शांतपणे त्‍यांच्‍या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.

ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजा व कामाच्‍या पद्धतींच्‍या आधारावर सोशल ऑफिस असे ठिकाण देते, जे उत्‍पादनक्षम, आनंददायी काम करण्‍याची सुविधा देईल. तसेच ते कामादरम्‍यान व कामानंतर सहका-यांसोबत चर्चा करण्‍याची संधी देखील देते.

गोदरेज इंटेरिओच्‍या विपणन विभागाचे (बी२बी) सहयोगी उपाध्‍यक्ष समीर जोशी म्हणाले, ”आम्‍ही मुंबई, पुणे, बंगळुरू, हैद्राबाद, चेन्‍नई आणि दिल्‍ली एनसीआर सारख्‍या मेट्रो शहरांमध्‍ये व्‍यवसाय केंद्रांची उपस्थिती पाहता सोशल ऑफिस फर्निचरला पसंती मिळण्‍याची अपेक्षा करतो. यासाठी बाजारपेठ नुकतीच निर्माण झाली आहे आणि ही बाजारपेठ २०० कोटीपर्यंत पोहोचण्‍याचा अंदाज आहे. पण ही वाढ १२ टक्‍के सीएजीआर दराने होण्‍याची अपेक्षा आहे. आम्‍ही आगामी वर्षांमध्‍ये कंपन्‍यांमध्‍ये सोशल ऑफिसचे ट्रेण्‍ड दिसून येण्‍याची अपेक्षा करतो. आर्थिक वर्ष १९-२० मधील १५०० कोटींच्‍या एकूण महसूलासाठी हे आमच्‍यासाठी विकासस्रोत ठरतील आणि वर्षानुवर्षे १२ टक्‍के दराने वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.”

मुंबईतील फोर्ट येथील आयकॉनिक गोदरेज भवन येथे ३,५०० चौरस फूटांवर पसरलेले एक्‍स्‍परिअन्‍स सेंटर सोशल कामाच्‍या ठिकाणाचा प्रत्‍यक्ष अनुभव देण्‍यासाठी तयार करण्‍यात आले आहे.