गुड फ्रायडे म्हणजे याच दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो. सुळावर चढवण्याच्या आधी एक दिवस येशू आपल्या शिष्यांसोबत शेवटचे जेवण म्हणजे ‘लास्ट सपर’ करते होते, तेव्हा ‘या शिष्यांपैकी एक शिष्य आपला विश्वासघात करेन, पण लोकांच्या पापांसाठी मला बलिदान द्यावेच लागेल’ असेही त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते.

दुस-या दिवशी सैनिकांनी येशूला पकडून नेले. येशूच्या शिष्यापैकी एक असलेल्या स्कार्‍योतीने काही चांदीच्या नाण्यांसाठी विश्वासघात करत सैनिकांना येशूपर्यंत पोहोचवले होते. येशूवर जेरूसलेम येथे न्यायालयासमोर खटला उभारण्यात आला. येशू हा स्वत:ला देवाचा पुत्र मानतो हा त्याच्यावरचा मुख्य आरोप होता. धर्मगुरूंनी त्याला याबद्दल विचारले असता आपण देवाचा पुत्र आहोत हेच तो शेवटपर्यंत सांगत राहिला. येशूचा न्याय करण्यासाठी त्याला रोमन गव्हर्नर पिलाता समोर आणण्यात आले, त्याच्या सुटकेसाठी त्याने प्रयत्नही पण अखेर येशूने क्रुसावर चढावे हे नियतीने लिहिले होते. पिलातने हा प्रश्न जनतेसमोर नेला. त्यावेळीच्या कायद्यानुसार पवित्र सणाच्या दिवशी एका कैद्याला सोडण्यात येई तेव्हा जनता योग्य न्याय करत येशूला मुक्त करेल अशी आशा पिलातासहित येशूच्या अनुयायांना होती पण अखेर दबावाखील असेल्या जनतेने येशूला सुळावर चढवण्याची मागणी केली. पण पिलाताने मात्र माझ्यालेखी हा माणूस निर्दोष असल्याचे सांगितले आणि जनतेने दिलेल्या निर्णयानुसार त्याला सैनिकांच्या ताब्यात दिले. सैनिकांनी डोक्यावर काट्याचे मुकूट ठेवून चाबकाचे फटके देत त्याची धिंड काढली. येशूचे अनुयायी आक्रोश करत होते तर कर्मठ लोक मात्र त्याची अवहेलना करत होते, पण या सगळ्यांना माफ करत त्यांच्या पापांसाठी त्यांना क्षमा कर असे स्वर्गातल्या आपल्या पित्याला सांगत त्याने प्राण त्यागले.

त्यामुळे येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून ग्रुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडेच्या आधी चाळीस दिवस अॅश वेन्सडे येतो या काळात ख्रिस्ती बांधव आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करतात. नंतरचा रविवार- म्हणजे ईस्टर सण्डे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो त्यामुळे ईस्टर संडे मोठ्या आनंदात ख्रिस्ती बांधव साजरा करतात.