डाऊनलोड न करताही गुगलवर खेळता येणार गेम्स

जगभरातील सर्व अँड्रॉईड युजर्सना मिळेल सुविधा

गुगलमुळे जगातील असंख्य लोकांचे जगणे सोपे झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्याला कोणतीही गोष्ट अडली की ज्याच्याकडे हक्कानी उत्तर मागता येते अशी जागा म्हणजे गुगल. एखादा रस्ता शोधण्यापासून ते पासपोर्ट काढून दुसऱ्या देशात रहायला जाण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची उत्तरे गुगल सहज देतो. गुगलवर गेम खेळून मनोरंजन करणारेही अनेक आहेत. विशेषत: लहान मुलांना रमविण्यासाठी आणि अनेकदा त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी हे गेम उपयुक्तही असतात. याच गेमशी निगडीत एक अॅप्लिकेशन गुगलने नव्याने लाँच केले आहे. गुगल प्ले इंस्टेंट हे त्याचे नाव आहे.

गेम खेळण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर किंवा एखाद्या अॅप्लिकेशनमधून ते डाऊनलोड करावे लागतात. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र आता डाऊनलोड न करताही गेम खेळता येणार आहेत. यासाठी गगलने एक नवीन अॅप्लिकेशन लाँच केले आहे. या नव्या फिचरच्या मदतीने प्ले स्टोर अॅप इनस्टॉल आणि डाऊनलोड केल्याशिवायच तुम्ही गेमचे प्रीव्हू पाहु शकाल. गुगल प्ले इंस्टेंट, गुगल प्ले स्टोअर, गुगल प्ले गेम्स आणि अन्य प्लॅटफॉर्म्सवर गेम्स उपलब्ध आहेत.

गुगल कायमच आपल्या फिचर्समध्ये नवनवीन बदल करुन आपल्या युजर्सना खूश करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचाच भाग म्हणजे गुगलने प्ले गेम्स अॅपच्या रिडिझाईन्सची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. गुगलने प्ले गेम्स अॅपमध्ये नवे UI अपग्रेड्स करण्यासोबतच नव्या इंस्टेंट कॅटेगरी सादर केल्या आहेत. या अपडेटमध्ये देण्यात आलेली आणखी एक सुविधा म्हणजे यामध्ये युजर्स व्हिडिओचे ट्रेलर्स देखील पाहू शकतात. याशिवाय सर्चचा पर्याय अपडेट करण्यात आला असून त्यामध्ये अनेक फिल्टर्सही देण्यात आले आहेत. जगभरातील सर्व अँड्रॉईड युजर्सना ही सुविधा वापरता येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Google launched google play instant new application easy for