Google Pay हे सध्याचे सर्वात लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट अॅप्लिकेशन आहे. आजवर या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण Goibibo, RedBus, Uber, Ola, Yatra यांसाख्या खासगी प्रवासी वाहनांची बुकिंग करत होतो. मात्र, आता Google Pay वर ट्रेनच्या तिकीट बुकिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. Android व IOS या दोन्ही प्रकारच्या ऑप्रेटिंग सिस्टमध्ये ही सुविधा आपण वापरु शकतो. तिकीट बुकिंगसाठी Google Pay मध्ये Book Train Tikits हा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाव्दारे ट्रेनमधील कोणत्या जागा रिकाम्या आहेत? व दोन स्टेशनमधील अंतर किती आहे? याबाबत योग्य माहिती आपल्याला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा पद्धतीने करता येईल तिकीट बुकींग

  • ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी Google Pay च्या Business सेक्शनमध्ये जावे. तेथे आपल्याला Book train tickets चा पर्याय मिळतो.
  • Book train tickets वर क्लिक केल्यानंतर कुठून कुठे आपल्याला प्रवास करायचा आहे याबाबत माहिती भरावी
  • आपण भरलेल्या माहितीनुसार आपल्याला ट्रेनची एक यादी मिळते. त्यात आपण आपल्याला हव्या असलेल्या ट्रेनमधील सीटची उपलब्धता व प्रवासी भाडे तपासून पाहू शकतो.
  • या यादीतील योग्य पर्यायावर क्लिक करावे आणि पॅसेंजर डिटेल्स भरावे.
  • त्यानंतर Continue वर क्लिक करा. बुकिंग कन्फर्मेशनची विचारणा आता करण्यात येईल. त्यानंतर पेमेन्ट मोड सिलेक्ट करून Continue करा.
  • आता आपला UPI PIN एन्टर करावा लागेल. त्यानंतर IRCTC वेबसाईटवर रिडायरेक्ट करण्यात येईल. येथे IRCTC पासवर्ड भरावा लागेल. त्यानंतर SUBMIT वर क्लिक करा. अशा प्रकारे तिकीट बुक होईल.

Google Pay चे प्रोडक्ट मॅनेजमेन्ट डायरेक्टर अम्बरिश यांच्या मते याआधी आपण Google Payच्या मदतीने केवळ खासगी वाहनांचे बुकींग करत होतो. मात्र हे अॅप आता IRCTC मध्येही उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे ट्रेनचा प्रवास अधीक सोयीस्कर होणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pay use for train ticket online booking
First published on: 10-04-2019 at 16:55 IST