मुंबई : अन्य देशांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याने धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे करोनाविषयक नियमांचे पालन करून गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केले.  करोना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी वापराची सक्ती सध्या कायम  राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 करोना रुग्णांची संख्या देशात खूप कमी झाल्याने यंदा गुढीपाडव्याचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यासाठी तयारी सुरू आहे. अनेक संस्था, उत्सव समित्या, मंडळे आणि राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रम, शोभायात्रा व मिरवणुकांचे आयोजन केले आहे. शोभायात्रांना काही ठिकाणी परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या करोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी  बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद करून टोपे म्हणाले, करोना रुग्णसंख्या घटल्याने मुखपट्टी सक्ती रद्द करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना व नागरिकांनी केली आहे. मात्र त्याबाबत वैद्यकीय कृतीगटाची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणुकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona restrictions gudipadva relaxed retention rajesh tope explanation ysh
First published on: 31-03-2022 at 00:03 IST