Happy Independence Day Wishes in Marathi: स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. यंदा १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवला.

हा ऐतिहासिक क्षण अबाधित राहावा यासाठी दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात जागोजागी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच विविध निवासी सोसायट्यांत ध्वजारोहण करून देशभक्तिपर कार्यक्रम ठेवले जातात. चला तर मग हा स्वातंत्र्य दिन आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवून आणखी खास करूया.

या खास प्रसंगी, आपले मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना तुम्ही खास मराठी शुभेच्छा पाठवू शकता. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेअर केल्या जातात.

independence day wishes in marathi
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मराठी

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वंदे मातरम!

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या
श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट मराठी स्टेटस (Independence Day Status in Marathi)

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्टच्या शुभेच्छा मराठी (15 August Independence Day Wishes)

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक,
तरी आम्ही सारे भारतीय एक,
७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाऊस पडू दे देश भक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,
अभिमान राहू दे शूर वीरांच्या त्यागाचा,
मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…
७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

स्वातंत्र्य दिनाच्या कोट्स  (15 August Shubhechha in Marathi)

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
– लोकमान्य टिळक

“स्वातंत्र्य दिले जात नाही; ते घेतले जाते.”
– विनायक दामोदर सावरकर

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
– लोकमान्य टिळक

एक देव एक देश एक आशा। एक जाती एक जीव एक आशा ।
– विनायक दामोदर सावरकर

दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजाद ही रहेंगे
– चंद्रशेखर आझाद

“क्रांती मानवता का एक निर्विवाद अधिकार है। स्वतंत्रता सभी का अविनाशी जन्मसिद्ध अधिकार है।”
– भगतसिंग