Happy Kartik Purnima 2022 Marathi Wishes: कार्तिकमध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. हा दिवस विष्णूला समर्पित आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान आणि तुळशीपूजनही केले जाते. यंदा कार्तिक पौर्णिमा ८ नोव्हेंबरला आहे. विशेष म्हणजे, या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही होत आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणे सर्वत्र दिवे दान करून देव दिवाळी साजरी केली जाते. या निमित्ताने यंदाच्या कार्तिक पौर्णिमेला खास बनवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज देत आहोत. जे तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता. चला तर मग पौर्णिमेनिमित्त खास मराठी शुभेच्छा पाहुया.

कार्तिक पौर्णिमा २०२२ मराठी शुभेच्छा

कार्तिक पौर्णिमेच्या आनंदोत्सवानिमित्त तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धी लाभो
या सुंदर दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो.

या कार्तिक पौर्णिमेला, सर्वशक्तिमान देव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो.
तुमच्यावर आनंद, उत्तम आरोग्य, संपत्ती आणि जगातील सर्व चांगुलपणाचा वर्षाव होवो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली
शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली
देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

आणखी वाचा : यावर्षीचं शेवटचं ‘पूर्ण चंद्रग्रहण’ भारतातील ‘या’ भागांमध्ये दिसणार; महाराष्ट्रातील वेळही जाणून घ्या

स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला
एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

तिमिरातून तेजाकडे नेणारा हा सण
दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट
नवी उमेद काजळी पुसण्याची, नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची
प्रकाशाचा हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

शंकरपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा देव दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या सणाला उजळू दे आकाश
सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास
आला आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!