‘व्हलेंटाईन डे’ म्हणजे आपल्या प्रेयसीसमोर आपली भावना व्यक्त होण्याची पाऊलवाट असते. ‘व्हलेंटाईन’च्या निमित्ताने प्रियकर आपल्या प्रेयसीला ‘व्हलेंटाईन फिल’ देण्यासाठी आधीपासूनच काहीतरी स्पेशल करण्याच्या तयारीत असतात. आपल्या रिलेशनशीपमधील प्रत्येक ‘व्हेलेंटाईन डे’ अविस्मरणीय ठरावा यासाठी प्रत्येक कपल काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. प्रेमाचा दिवस म्हणून ओळख असलेल्या ‘व्हलेंटाईन डे’ च्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला आवडेल असा हृदस्पर्शी मेसेज देण्यासाठी मुलं उत्सुक असतात. त्यासाठीची शोधाशोध देखील सुरू असते. मग छान छान ग्रिटींग कार्ड शोधली जातात, सोशल मीडियावर ‘व्हलेंटाईन डे’ मेसेजेसच्या सर्चचा धुमाकूळ होतो. प्रेम विषयक मेसेजेस, कविता, शायरी यांची मागणी वाढते. काय करावं? तिच्या समोर आपल्या भावना शब्दांमध्ये कशा व्यक्त कराव्यात? अशा पेचात मुलं सापडतात. ‘व्हलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रेयसीसमोर आपल्या भावना शब्दांत व्यक्त कऱण्यासाठी ‘साथ’ देतील असे संदेश-

– सहवास तुझा नेहमी असाच राहूदे..
ओंजळीत अपुल्या स्वप्नांचे घरटे
हात तुझा हातात माझ्या सदैव राहू दे..

– साथ तेरा हमेशा मिला..प्यार का इजहार होना बाकी था
परिंदो को था खुलके उडना.. तुझे समजना बाकी था

– प्रेम असेच असते गुलाबाच्या फुलासारखे बहरत राहते आपल्या स्मृतिगंधाने मनाच्या कोंदणात…सदैव..तु फक्त सोबत रहा.

– मैत्री बंधनातल्या धाग्यांना मिळूदे प्रेमाचा रंग..
सुख, दु:खांच्या वळणांवरचे सोबती आपण
आयुष्य नावाच्या पायवाटेवर प्रवास अपुला असेल निरंतर
वचन माझे.

– भावना मनी व्यक्त होता होता राहिली होती..
मनास कळली..पण कळवणे तुझं बाकी होती..
प्रेमाचा दिवस औचित्य ठरो..मनातली भावना तुझंला कळो..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ठेहेरे रहे हम समंजस-नासमंजस की गर्दीश में
यादों ने दिल का कहां बता दिया…
साथ रेहेना हमेशा राह की हर मंजिल पर..
तारों को चमकना आपने सिखा दिया..