जर तुमच्याकडे असलेल्या हार्ले-डेव्हिडसन बाईकच्या ऐवजी तुम्हाला नवीन हार्ले-डेव्हिडसनचे वेध लागले असतील, तर कंपनीने एक शानदार बायबॅक ऑफर आणली आहे. हार्ले-डेव्हिडसनने मान्सून बायबॅक योजना सादर केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही जुन्या बाईकच्या बदल्यात नवीन बाईक घेऊन जाऊ शकतात. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे तुमची बाईक एका वर्षापेक्षा जुनी नको.
या बायबॅक ऑफरनुसार जर तुमची हार्ले एक वर्षांपेक्षा जुनी नसेल तर तुम्हाला तुम्ही ज्या किंमतीला ती विकत घेतली असेल ती एक्स-शोरूम किंमत परत मिळणार आहे. आणि तुमच्याकडे असलेली स्ट्रीट 750 किंवा स्ट्रीट रॉड बाईक 12 ते 24 महिने इतकी जुनी असेल तर तुम्ही एक्स शोरुम किंमतीच्या 75 टक्के रकमेइतका बायबॅकचा लाभ घेऊ शकतात. थोडक्यात म्हणजे ज्या ग्राहकांना आपली हार्ले अपग्रेड करायची असेल, आहे त्या पेक्षा वरच्या दर्जाचं मॉडेल घ्यायचं असेल तर गेल्या दोन वर्षांच्या आत खरेदी केलेली हार्ले परत करून दोन मॉ़डेलच्या किमतीमधला जो फरक आहे तो फरक भरून नवीन हार्ले घेण्याची मुभा मिळणार आहे. हार्लेप्रेमींसाठी ही पर्वणी ठरेल यात काही वाद नाही.
भारतीय बाजारात हार्ले-डेव्हिडसनचे सध्या 6 मॉडेल्स उपलब्ध आहेत. यापैकी स्ट्रीट बॉब हे मॉडेल सर्वात स्वस्त असून 12.59 लाख रुपये इतकी याची किंमत आहे. तर हार्लेची सर्वात महागडी बाईक हेरिटेज सॉफ्टेल क्लासिक आहे. या बाईकची किंमत 19.71 लाख रुपये आहे.