तुम्ही अनेक घरांभोवती मधमाशांनी पोळे बनवल्याचं पाहिलं असेल, अनेकदा मधमाशा आपलं पोळे अशा ठिकाणी तयार करतात, जिथे घरातील लोकांचा चुकून हात लागू शकतो आणि ज्यामुळे माशा त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते. शिवाय जरी आपणाला ते पोळे हटवायचे असेल तरीही भिती वाटते, कारण त्या कधी आपल्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही. जर तुम्हालाही या मधमाश्यांचा त्रास होत असेल आणि त्यांना पळवून लावायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही त्यांना सहज पळवून घालवू शकता, कसं ते जाणून घ्या.

मधमाश्यांना पळवून लावण्याचे घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –

धूर –

घरातून मधमाशांना घालवण्यासाठी त्यांच्या पोळ्याखाली काही वाळकी लाकडे किंवा पेपर ठेवा आणि त्यावर कडुलिंब किंवा कोणत्याही झाडाची पाने ठेवून त्याला आग लावा. त्यानंतर तिथून दूर या आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे राहा. हा धूर पोळ्यापर्यंत पोहोचताच मधमाशा पोळ्यातून बाहेर पडून इकडे तिकडे धावतील. त्यानंतर काही तासांतच त्या पोळे सोडून दूर निघून जातील.

हेही वाचा- डायबिटीजच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या ‘या’ फळांचे आणि पदार्थांचे सेवन करणे टाळावे

व्हिनेगर –

मधमाशांना दूर घालवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. एखाद्या स्प्रेच्या बाटलीमध्ये अर्धे व्हिनेगर आणि अर्धे पाणी घ्या. या मिश्रणाच्या मदतीने तुम्ही मधमाश्यांना पळवून लावू शकता. मात्र, यावेळी तुम्ही असे कपडे घाला ज्यामुळे तुमचे पुर्ण शरीर झाकले जाईल. अशी कपडे घातल्यानंतरच मधमाशांचे पोळे ज्या ठिकाणी आहे तिथे जा आणि त्यावर हे मिश्रण फवारा.

हेही वाचा- Beauty Tips: नितळ आणि सुंदर त्वचेसाठी आवश्यक असणाऱ्या ‘या’ ३ गोष्टी जाणून घ्या

दालचिनी –

तुम्ही दालचिनीच्या मदतीने मधमाशांना घालवू शकता. एका कागदात किंवा भांड्यात दालचिनी जाळून मधमाशांच्या पोळ्याखाली ठेवा. दालचिनीचा वास खूप तीव्र असतो जो मधमाशांना सहन होत नाही.

लसूण –

एका बाटलीत लसणाची पेस्ट टाका आणि त्यात पाणी मिसळा. हे मिश्रण मधमाशांच्या पोळ्यावर फवारा.

अंडी क्रेट-

तुम्ही अंडी क्रेटच्या साहाय्याने मधमाशांना घालवू शकता. यासाठी तुम्ही अंड्याचा क्रेट पेटवून मधमाशांच्या पोळ्याखाली ठेवा. थोड्याच वेळात सर्व मधमाश्या तिथून पळून जातील.

उपाय करताना ही काळजी घ्या –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्व प्रथम, घराचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद करा.
  • ब्लँकेट वगैरे झाकूनच हे उपाय करा.
  • गरज असल्यास डोक्यावर हेल्मेट घालून हे काम करा.
  • पोळ्यातून सर्व मधमाशा गेल्याची खात्री करुनच त्याच्याजवळ जा.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत असून अधिकच्या माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.)