घरातील कीटक आणि डासांचा त्रास होतोय ? तर ‘या’ वनस्पतींची घ्या मदत

डास डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजार पसरवतात.1 आजकाल डासांचा सामना करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे आणि रसायने उपलब्ध आहेत. परंतु , जाणून घ्या अशा काही वनस्पती ज्या तुम्हाला डासांच्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात.

घरातील कीटक आणि डासांचा त्रास होतोय ? तर ‘या’ वनस्पतींची घ्या मदत
( संग्रहित छायचित्र )

पावसाळ्यात डास जरा जास्तच घरात आल्याचे पाहायला मिळतं. डास चावल्याने डेंग्यू, मलेरियासारखे घातक आजार पसरतात. डासांचा सामना करण्यासाठी आजकाल अनेक प्रकारची औषधे आणि रसायने बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ही रसायने आणि औषधे कधीकधी डासांच्या व्यतिरिक्त घरातील सदस्यांनाही धोका देऊ शकतात. जर तुम्हालाही या ऋतूमध्ये डासांचा त्रास होत असेल तर अशी काही वनस्पती सांगणार आहोत, जी लावल्याने तुमच्या घरात डास येणार नाहीत.

१) तुळस

तुळस प्रत्येकाच्या घराबाहेर असते. तुळशीची आपण पूजा देखील करतो. तसंच आरोग्यासाठी सुध्दा तुळस भरपूर फायदेशीर आहे. डासांच्या अळ्या आणि इतर कीटकांना मारण्यासाठी तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त आहे. तुळशीला तीव्र वास असतो ज्यामुळे कीटक आणि डास दूर होतात. त्यामुळे तुळशीचे रोपटे नक्की घराबाहेर लावा.

२) रोजमेरी

गुलमेहंदी ज्याला आपण रोजमेरी म्हणूनही ओळखतो. अशी एक वनस्पती आहे जी डास आणि इतर प्राण्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या वनस्पतीचा वास तिखट असतो ज्याने डास , कीटक पळून जातात.

३) पुदिना

प्रत्येकाच्या घरी बनवल्या जाणार्‍या जवळपास प्रत्येक पदार्थात पुदिना वापरला जातो. पुदिनामध्ये असा वास असतो जो कीटक आणि डासांना दूर ठेवण्याचे काम करतो. त्यासाठी तुम्ही पुदिनाचे रोपटे नक्की घराबाहेर लावा. ज्यामुळे तुमची डासांची समस्या दूर होईल.

४) झेंडूचे फुल

झेंडूचे फूल प्रत्येकाला माहिती आहे, त्याला इंग्रजी भाषेत देखील झेंडू असे म्हणतात. या वनस्पतींच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात. तुम्ही ही वनस्पती घरामध्ये किंवा बाहेर कुठेही ठेवू शकता. झेंडूचे रोपटे घराबाहेर लावल्याने डास आणि कीटक जवळ येत नाही.

५) लेमनग्रास

लेमनग्रासला उग्र वास येतो जो घरातील डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. लेमन ग्रासमध्ये सिट्रोनेला नावाचा नैसर्गिक घटक असतो ज्यामुळे डास दूर करतो आणि त्यांना मारतो. त्यामुळे घरात लेमनग्रास नक्की लावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Having pests and mosquitoes in the house so take the help of these plants gps

Next Story
कडुलिंबाच्या पानांमुळे ‘या’ १० समस्यांपासून मिळतो आराम , जाणून घ्या कसा करायचा वापर
फोटो गॅलरी