दिवसभर धावपळ करुन थकल्यावर केवळ ज्याच्या उच्चारानेच तरतरी येते ते पेय म्हणजे चहा. भारतीयच नाही संपूर्ण जगभरामध्ये चहाचे अनेक चाहते आहेत. चहाशिवाय सकाळ म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. विशेष म्हणजे चहावर लोक करत असलेल्या याच प्रेमापोटी चहा हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय ठरते. त्यातच आजचा दिवस चहाप्रेमींसाठी खास आहे. १५ डिसेंबर हा जागतिक चहा दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की चहाचं सेवन केल्यामुळे अॅसिडीटी वाढते. परंतु चहाचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर त्याचे काही फायदेही पाहायला मिळतात. त्याच ब्लॅक टीचे तर बरेच फायदे आहेत.
ब्लॅक टी पिण्याचे फायदे –

१. वजनवाढीवर नियंत्रण –
‘ब्लॅक टी’मध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे फॅट बर्न होण्यास तसेच लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. चहामध्ये दूध घातल्याने अँटीऑक्सिडंटसचा परिणाम कमी होतो. इतकेच नाही तर ‘ब्लॅक टी’मुळे भूक कमी लागूनदेखील शरीराला जास्त ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त अॅक्टीव राहतो.

२. पचनक्रिया सुधारते –
खाल्लेल्या अन्नाचे चांगल्यारितीने पचन करण्यासाठी ‘ब्लॅक टी’ अतिशय उपयुक्त ठरतो. पचनशक्ती चांगली करण्यासाठी तसेच, पोटदुखी, गॅस यांच्यावर उत्तम उपाय म्हणून काम करतो. या समस्या दूर झाल्यामुळे आपल्याला हलके आणि शांत वाटते.

वाचा :  ‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी

३. हृदयाशी निगडीत अडचणी दूर करण्यास उपयुक्त –
रोज ‘ब्लॅक टी’ प्यायल्यास वजन कमी होण्याबरोबरच पचनक्रियाही सुधारते. यामुळे हृदयाशी निगडीत अडचणी दूर होण्यास मदत होते. कोलेस्टरॉलची पातळी योग्य ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.