लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. या मालमत्ताधारकांना देयकाबरोबरच जप्तीपूर्व नोटिसा देण्यास कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरुवात केली आहे.

Anil Ambani banned from capital market for five years
अनिल अंबानींना भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी; बाजार नियामक ‘सेबी’कडून २५ कोटींचा दंडही
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
bank total debt burden at the end of july crosses 9 lakh crores
बँकांकडूनच वाढती उसनवारी! जुलैअखेर एकूण कर्जभार ९ लाख कोटींपुढे
Mumbai, road works Mumbai,
मुंबई : रस्ते कामांसाठीच्या खर्चात मोठी वाढ, साडेआठ हजार कोटींवर खर्च; लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश
Pimpri chinchwad municipal corporation, officers, employees, transfers, Bombay High Court, policy, Executive Engineer, Deputy Engineer, Junior Engineer,
पिंपरी : एकाच जागी अनेक वर्षे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी
1 41 lakh crore loans written off by State Bank of india
स्टेट बँकेकडून १.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित; आठ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली
State Banks loans worth lakhs of crores were written off recovering only 12 per cent from large defaulters
स्टेट बँकेचे लाखो कोटींच्या कर्जावर पाणी! बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली
diamond buisness falling
‘या’ नामांकित कंपनीने ५० हजार कर्मचार्‍यांना पाठवले १० दिवसांच्या पगारी रजेवर; काय आहे कारण?

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळी जमीन, मिश्र यांसह विविध अशा सहा लाख २५ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. सरत्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहा लाख २५ हजार मालमत्तांपैकी पाच लाख ११ हजार १५४ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला. मात्र, ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. सर्वाधिक दहा हजार २०९ थकबाकीदार हे चिखली विभागात आहेत. थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यात अपयश आल्याने कर संकलन विभाग एक हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला नाही.

आणखी वाचा-पुणे : हडपसर वैदुवाडी परिसरात झोपड्यांना आग

बचत गटातील महिलांमार्फत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ताकराच्या देयकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. घरोघरी जात देयकांचे वितरण केले जात आहे. सव्वासहा लाख देयकांचे पुढील दहा दिवसांत वाटप पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

देयकांसोबत मतदार जनजागृती

पिंपरी-चिंचवड शहर मावळ, शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघात विभागले आहे. ७ मे रोजी बारामतीमध्ये तर मावळ आणि शिरूरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कर संकलन विभागाकडून देयकांसोबत मतदार जनजागृती केली जात आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिलेली मतदान जनजागृतीची पत्रकेही घरोघरी देण्यात येत आहेत.