पावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती चहाजाचा वास सर्वत्र दरवळू लागतो. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे काही फायदे. –

गवती चहा पिण्याचे फायदे-

१. सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.

२. पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.

३. थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

४. जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.

५. डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.

६.गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.

७. शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गवती चहाला सुगंध भूतृण (संस्कृत), अग्याघास, गंधबेना (हिंदी), हरिचांय (सिंधी), गंधतृण (बंगाली), लेमनग्रास (इंग्रजी) अशा विविध नावाने संबोधलं जातं. तर त्याच्या अर्कास‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल’ असेही म्हणतात.