करोनाचा कहर काय संपता संपत नाही. आता एक लाट गेली अन दुसरी लाट सुद्धा आली. अशा वेळी आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सदृढ रहाणे महत्वाचे आहे. यामुळे शरीराबरोबरच मनालाही सात्विक व पौष्टिक अन्न खाणे गरजेचं आहे. याच बरोबर व्यायाम देखील केले पाहिजे. तुम्हाला माहितीये का आपला आहार हे मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास देखील मदत करते? आहार तज्ज्ञ आपल्याला भाज्या, फळे, अंडी, मासे, बदाम, दही, सोयाबीन  अशी पोष्टिक पदार्थ खाण्याचे सल्ले देतात. मात्र काही जण आपला आहार निवडताना शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन निवड करतात,पण मानसिक दृष्ट्या आहार निवडायला विसरतात. चला तर जाणून घेऊयात मानसिक आहाराबद्दल कोणते अन्न पदार्थ सेवन केले पाहिजे.

मानसिक आहाराबद्दल जाणून घेऊयात या ७ टिप्स

१) मासे

माश्यांना ब्रेन फूड असे देखील म्हंटले जाते. कारण माश्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असत.आणि हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओमेगा 3 फॅटी एसिड हे आपल्या शरीरातील नकारात्मक आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करते. 

२)बेरी

आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये स्ट्रॉबेरी,ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी या फळांचा समावेश असावा. या फळांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील पेशींना मजबुती मिळते. आणि पोटातील जळजळ कमी होते. याच बरोबर चिंता व नैराश्यपणा कमी करते. 

३) दही

दह्याचे सेवन केल्याने पोट हे ठीक राहते.योग्य प्रमाणात दही खाल्ल्याने आरोग्य चांगले रहण्यास मदत करते. बहुतेक लोकं ही प्रोबियोटिक्ससाठी दही खातात. आणि काही अहवालनुसार पोटांच्या आतड्यांचा आणि मेंदूचा सखोल संबंधामुळे दही खाल्ल्यास तणाव आणि अस्वस्था कमी होऊन मानसिक दृष्ट्या  योग्य राहते. 

४) संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य म्हणजे ज्यात ज्वारी, तांदूळ, गहू हे आणि या धान्यांन पासून बनवलेले पदार्थ हे शरीरसाठी उपयुक्त आहे. या पदार्थांपासून ट्रिपटोफन नावाच्या एमिनो एसिड तयार होऊन शरीरातील एक चांगला स्त्रोत बनतो व शरीरात फील-गुड हार्मोन सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतो. यामुळे मनःस्थिती सुधारते आणि झोपेची चक्र सुधारते. 

५) अक्रोड

आपला मानसिक आरोग्य  नेहमी छान उत्साहित राहावे यासाठी नेहमी पोटभर नाश्ता करावा. आणि आहारात अक्रोडचा समावेश करावा, कारण अक्रोड हा मेंदूच्या रचनेसारखा दिसतो, आणि हाच अक्रोड मेंदूला चालना देण्याचे काम करतो. एकंदरीत अक्रोड खाल्ल्याने आरोग्य छान राहते, त्याच बरोबर हे अँटीऑक्सिडंट्सचे भंडार असून मेंदूच्या नवीन पेशी बनवण्यास व त्यांना उत्तेजित करण्यास मदत करते आणि आपला मानसिक आरोग्य छान मस्त राहते. 

६) हिरव्या पाले भाज्यांचे सेवन

हिरव्यागार पालेभाज्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य जपून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर काम करतात. न्यूरोलॉजी या विज्ञान जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पालक आणि इतर हिरव्या भाज्यांचे सेवन करणार्‍या लोकांमध्ये संज्ञानात्मक घट कमी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७) सोयाबीन

सोयाबीनच्या सेवनाने मानसिक आरोग्य एकदम उत्साहित राहते, कारण सोयाबीन हा फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्ससह परिपूर्ण आहार आहे. एवढच नव्हे तर हे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते, जे जास्त ऊर्जा देणायचे काम करते. सोयाबीनच्या सेवनाने मानसिक आरोग्य सुधारते. आणि त्यातं थायमिन व्हिटॅमिन असते जे स्मरणशक्ती सुधारते.

अश्या या सात टिप्स आपल्या रोजच्या आहारात समावेश करून घेतलात तर करोनाकाळात देखील आपले शारीरिक आरोग्यबरोबर मानसिक आरोग्य देखील तणाव मुक्त आणि आनंददायी राहील.