थंडी सुरू झाली की पेरु मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. भारतात नोव्हेंबर पासून पेरूचा हंगाम सुरू होतो. या हंगामात पांढरा आणि गुलाबी गर असलेले पेरु मोठ्या प्रमाणात मिळतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ तसेच काही प्रमाणात ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्वदेखील पेरूमध्ये आहे. मूळचे दक्षिण अमेरिकेतील फळ असलेल्या पेरूचं भारतातही मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. पेरुचे फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत, ते कोणते हे जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे आहेत नारळपाण्याचे फायदे

– पेरू हे भूक मंदावणे, आम्लपित्त यासारख्या विकारांवर फायदेशीर आहे.
– मलावरोधाचा त्रास होत असेल तर पेरू खाल्याने पोट साफ होते.
– पेरुमध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे आणि पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.
– तोंडाची चव गेली असल्यास, उलटी किंवा मळमळ झाल्यासारखं वाटत असल्यास पेरुचे सरबत अधिक फायदेशीर ठरते.
– दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन अ‍ॅसिड या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते.
– आयुर्वेदात पेरूचा उल्लेख बुद्धिवर्धक फळ असा करण्यात आला आहे, त्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला तर मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते.

‘ही’ फळे एकाचवेळी खाणे आरोग्यास अपायकारक

पेरु कधी खावा?
– दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. पेरुमुळे सर्दी होण्याची शक्यता असते, म्हणून पेरू खाताना किंचितसं सैंधव मीठ, जिरे, मिरे पूड घालून खावे, यामुळे पेरू बाधत नाही.
– सकाळी किंवा रात्रीच्यावेळी पेरू खाणं टाळावं.
– शक्यतो फ्रिजमध्ये पेरू ठेवून तो खाऊ नये.
– कच्चा पेरू खाण्याऐवजी मध्यम आकाराचा पिकलेला पेरू खावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips guava fruits benefits for health in marathi
First published on: 30-10-2017 at 11:52 IST