21 Year Old Dies Due To Lemonade: प्रसिद्ध अमेरिकन फास्ट-फूड कंपनीच्या चार्ज्ड लेमनेड (लिंबू सरबत) मुळे २१ वर्षीय विद्यार्थिनी सारा कॅट्झचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या विद्यार्थिनीला लाँग क्यूटी टाइप 1 सिंड्रोम होता. ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाची विद्युत लय प्रभावित होऊन जीवघेणी परिस्थिती ओढवू शकते. अहवालांनुसार मृत तरुणीने कॅफिनयुक्त पेये टाळून ही स्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र घटनेच्या दिवशी तिने ३९० mg कॅफिन असलेले अधिक कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक प्यायले होते. हे एक पेय कॉफीच्या चार कपांच्या बरोबरीचे होते आणि त्यादिवशी नंतर तिचे निधन झाले. या प्रकरणानंतर सदर कंपनीवर टीका होत असून त्यांनी कॅफिनच्या वापराविषयी व प्रमाणाविषयी सविस्तर माहिती देणे गरजेचे होते असे म्हटले जात आहे.

या घटनेने पुन्हा एकदा एनर्जी ड्रिंक्सच्या अतिसेवनाचे विशेषत: १८ वर्षाखालील तरुणांमधील दुष्परिणाम सर्वांसमोर आणले आहेत. जागतिक स्तरावरील अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, काही तरुण ग्राहकांमध्ये कॅफीन ऍलर्जीचा धोका दिसून आला आहे, ज्यामुळे शारीरिक बदल दिसून येऊ लागतात.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
12-year-old child molested by minors
मुंबई : १२ वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी

इंडियन एक्सस्प्रेसने, बॉम्बे हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. गौतम भन्साली, यांच्या हवाल्याने तरुणांमधील कॅफिनच्या वारंवार सेवनाच्या सवयी व त्याच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

एनर्जी ड्रिंकमुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार वाढू शकतात का?

जास्त प्रमाणात कॅफीन सेवन केल्याने टाकीकार्डिया होऊ शकतो, म्हणजे काय तर, तरुणांमध्ये अचानक हृदयाची धडधड अधिक गतीने होणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्यात अडथळे येऊ शकतात. यात अगोदरच जर तुम्हाला कॅफिनची ऍलर्जी किंवा अन्य काही आजार असतील तर जोखीम आणखी वाढू शकते. एनर्जी ड्रिंकचा उत्तेजक प्रभाव झोपेमध्ये सुद्धा व्यत्यय आणू शकतो परिणामी तुम्ही निद्रानाश सुद्धा अनुभवू शकता. पुरेशी झोप न झाल्याने, नेहमीची कामे करण्यात सुद्धा अडथळा येऊ शकतो, मूड खराब होऊ शकतो.

एनर्जी ड्रिंकमुळे वजन व दातांचे आरोग्य कसे बिघडते?

क्लिनिकल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सतत एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे लठ्ठपणा आणि दाताच्या समस्यांबद्दल चिंता निर्माण होते. अधिक साखर ही कॅलरी सेवन वाढण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे कालांतराने वजन वाढण्याची शक्यता असते. अतिवजन हे परिणामी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी सुद्धा जोखीम घटक सिद्ध होऊ शकते. याव्यतिरिक्त, एनर्जी ड्रिंक्समधील साखर आणि आंबटपणामुळे दातांना धोका निर्माण होतो, ज्यामुळे पोकळी तयार होते तसेच दातांना सुरक्षित ठेवणारा दातांवरील थर सुद्धा नष्ट होऊ लागतो.

एनर्जी ड्रिंकचे व्यसन लागू शकते का?

एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे न्यूरोट्रांसमीटरवर प्रभाव करून एडेनोसिन आणि डोपामाइन वाढवते. ज्याचा मूड, ऊर्जा व उत्तेजनावर परिणाम होतो. एनर्जी ड्रिंक्सच्या नियमित सेवनामुळे व्यसन लागू शकते ज्यात खंड पडल्यास लालसा निर्माण होणे व अस्वस्थ वाटणे अशी स्थिती उद्भवते. तरुण वयात जेव्हा मज्जासंस्था अजूनही विकसित होत असतात तेव्हा उत्तेजक पेयांमुळे व्यवसानाधीनतेकडे वळण्याची गती अधिक वाढू शकते.

हे ही वाचा<<तुम्ही एका महिन्यात एकदाही कोल्ड्रिंक प्यायला नाहीत तर.. डॉक्टरांकडून जाणून घ्या शरीरात होणारे बदल

डॉ. भन्साली सुचवतात की, लहान वयातच मुलांना अशा एनर्जी ड्रिंकच्या सेवनाची सवय लागू न देण्यासाठी पालकांनी त्यांना या पेयांचे परिणाम समजावून सांगायला हवेत. तसेच पाणी, फळांचे ताजे रस, साखर न घालता नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले ज्यूस हे पर्याय तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात.