How cuddling is beneficial for health : अनेकदा आपल्याला कुठल्या गोष्टीचा ताण येतो, तणाव जाणवतो तेव्हा तो घालवण्यासाठी कुणालातरी घट्ट मिठी माराविशी वाटते. कुणालातरी जवळ घ्यावेसे वाटते.. या क्रियेलाच कडलिंग [cuddling] असे म्हणतात. कडलिंग हे पालक-मुले, मित्र किंवा जोडीदार असे कुणीही करू शकतात. अशी क्रिया करण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असतात. कडलिंग करण्याने, ऑक्सिटोसिन [oxytocin] किंवा ज्याला आपण ‘बॉन्डिंग हार्मोन’ म्हणतो तो कार्यरत होऊन आपल्या मनातील विश्वास, आत्मियता आणि सलगीच्या भावना जागृत करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिठी मारण्याचे किंवा कडलिंगचे आपल्या आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात, याबद्दल मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर शौनक अजिंक्य [Dr Shaunak Ajinkya, Consultant Psychiatrist, Kokilaben Dhirubhai Ambani Hospital, Mumbai,] यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. त्यात डॉक्टर शौनक काय म्हणाले आहेत ते पाहू.

हेही वाचा : तीन महिने ‘सोडा’ टाळल्याने शरीरात कोणते फरक दिसतील? प्रसिद्ध रॅपरचा २५ किलो वजन कमी करताना फक्त..

मिठी मारणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते

मिठी मारल्यामुळे किंवा शारीरिक स्पर्शामुळे आपल्या शरीरात असणाऱ्या ‘कॉर्टिसोल’ [cortisol] सारख्या तणाव हार्मोन्सची पातळी काही प्रमाणात कमी होते. अशा स्पर्शामुळे, हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाब संतुलित ठेऊन चिंता/ एन्गझायटी कमी करून, व्यक्तीला विश्रांतीसाठी परिणामी त्याच्या उत्तम आरोग्यास प्रोत्साहन मिळते. केवळ ३० मिनिटांच्या शारीरिक स्पर्शामुळे कॉर्टिसोलची पातळी ही साधारण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे एका अभ्यासातून दिसून आले असल्याचे डॉक्टर शौनक म्हणतात.

मिठी मारल्याने शारीरिक आणि भावनिक वेदनांना दूर ठेवता येऊ शकते.

शरीरात जाणवणाऱ्या वेदना, उदाहरणार्थ – डोकेदुखी, स्त्रियांना मासिकपाळीदरम्यान जाणवणारे क्रॅम्प किंवा दुःख, एकटेपणा अशा भावनिक दुखापतींना दूर करण्यासाठी एंडोर्फिन [endorphins] हा घटक मदत करतो. मिठी मारल्याने आपल्या शरीरातील ‘एंडोर्फिन’ घटक उत्तेजित होण्यास मदत होते. इतकेच नाही, तर या घटकामुळे आपला मूडदेखील सुधारण्यास खूप फायदा होतो. व्यक्तीला आनंदी आणि समाधानाची भावना या एंडोर्फिनच्या उत्सर्जनातून मिळते. आपली ताण-तणावाची पातळी कमी झाल्याने आणि या ‘आनंदी’ हार्मोन्समुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास, मजबूत करण्यास मदत होते.

हेही वाचा : कितीही काम असू दे, स्वतःच्या आरोग्याची हेळसांड नको; आहारात करा या पाच पदार्थांचा आवर्जून समावेश

मिठी मारून झोपणे

झोपताना व्यक्तीला मिठी मारून झोपण्याने शरीरास अधिक आराम मिळतो, मनातील कोणत्याही प्रकारच्या असुरक्षिततेच्या भावना कमी होतात. परिणामी व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तसेच व्यक्तीला अधिक लवकर, उत्तम दर्जाची आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

मिठी मारणे हे काही केवळ सामाजिक किंवा कुणाचे पाहून आपल्याला कराविशी वाटणारी क्रिया. मिठी मारण्याची इच्छा, भावना ही आपल्या मनात आपल्या जीन्समध्येच [जनुकांमध्ये] सुरुवातीपासूनच आहे. शारीरिक स्पर्शाची इच्छा आणि त्यातून मिळणारे समाधान हे खरंतर उत्क्रांतीच्या वेळी आणि उत्क्रांतीच्या दृष्टीने प्रचंड फायदेशीर होते, असे डॉक्टर शौनक सांगतात. त्याचे कारण म्हणजे, त्या काळात सस्तन प्राणी थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या घरात एकमेकांच्या जवळ झोपत असे. तेव्हा या क्रियेने त्यांचे थंड वातावरणापासून संरक्षण झाले. तसेच एकत्र राहिल्याने इतर भक्षकांपासून त्याचे रक्षण झाले आणि विविध गटांमधील सामाजिक संबंध वाढू लागले.

उत्क्रांतीदरम्यान अशी बालके सर्वात अधिक सुदृढ असायची, जी त्यांच्या आईबरोबर भावनिकरीत्या सर्वाधिक जवळ होती. म्हणजेच आईबरोबर ‘अटॅचमेंट’ [attachment] जास्त असणारी मुलं त्या काळात सर्वात जास्त तंदुरुस्त असायची. अशी जॉन बॉलबीची ‘अटॅचमेंट थिअरी’ [John Bowlby’s Attachment theory] आहे. म्हणूनच कदाचित कडलिंग किंवा मिठी मारणे ही क्रिया एकप्रकारे, ‘सर्व काही नीट होईल चिंता करू नका’, असे सूचित करत असते.

आपल्या जोडीदाराच्या भावना कोणत्याही शब्दांचा वापर न करता समजण्याचा, विना-संवाद संवाद साधणे हे कडलिंगमुळे शक्य होते. अशी मिठी मारण्याने दोन व्यक्तींमधील जवळीक वाढते. एकमेकांना समजून घेण्याची, नातेसंबंध मजबूत होऊन व्यक्तीमध्ये समाधानाची भावना निर्माण होते.

हेही वाचा : आरोग्य जपायचे तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी नकोच! मात्र असे का? त्याची करणे जाणून घ्या…

विविध संशोधने शारीरिक स्पर्शाबद्दल, ऑक्सिटोसिनबद्दल काय सांगते?

मानवाच्या भावना समजून घेण्यासाठी, शरीरातील विविध हार्मोन्सचा अभ्यास केला जातो. अशा वेगवेगळ्या संशोधनांमधून ‘ऑक्सिटोसिन’चादेखील अभ्यास करण्यात आला. तेव्हा ऑक्सिटोसिनमुळे सामाजिक वातावरणातील तणाव आणि चिंता दूर होऊ शकतात असे समोर आले. एका प्रयोगामध्ये ज्या व्यक्तींनी ऑक्सिटोसिन या घटकाचा वास घेतला होता, त्या व्यक्तींना दिसणाऱ्या सामाजिक जाहिराती अधिक प्रमाणात संवेदनशील वाटू लागल्या होत्या असे आढळून आले. कारण- ऑक्सिटोसिनचा वास घेतलेल्या व्यक्ती, ऐकवण्यात येणाऱ्या सामाजिक घोषणांप्रती किंवा सामाजिक जाहिरातींबद्दल अधिक सहानुभूती दाखवून त्या कारणांसाठी देणगी देण्यास तयार होते, असे प्रयोगांमधून दिसून आले आहे. संशोधकांनी, स्पर्श व्यक्तीचा ताण-तणाव कमी करू शकतो; तसेच तिच्यात सुरक्षित आणि विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो, असे दाखवून दिले आहे. अशी माहिती डॉक्टर शौनक अजिंक्य यांनी, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिल्याचे त्यांच्या एका लेखातून समजते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of cuddling for heart health to quality sleep check out what doctor say about this dha
First published on: 20-02-2024 at 14:26 IST