scorecardresearch

लठ्ठपणामुळे होणारा मधुमेहाचा धोका कमी करु शकते कॅफीन, संशोधनाचा निष्कर्ष

एका अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास आणि टाइप 2 मधुमेह व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याचा धोका कमी करते.

caffeine could reduce obesity risk of diabetes
कॅफीन ( Image Credit : Freepik )

आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या खाण्यापिणाच्या पदार्थांमध्ये मोठा बदल झाला आहे. फास्ट फूड, जंक फूड अशा आरोग्यासाठी हानिकारक पदार्थांच्या सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि ह्रदयासंबधीच्या आजारांना निंमत्रण देत आहोत. या आजारांचा सामाना करण्यासाठी अनेक उपाय आणि औषध उपचारांचा आधार घ्यावा लागतो. याबाबत अनेक संशोधन अभ्यास समोर आला आहे. अशाच एका संशोधनानुसार, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने लठ्ठपणामुळे होणारा टाइप 2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी करतो असा दावा करण्यात आला आहे.

लठ्ठपणाामुळे होणारा टाइप 2 मधुमेह कमी करण्यासाठी उपयूक्त ठरते कॅफीन


बीएमजे मेडिसीनमध्ये या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, हे निष्कर्ष लठ्ठपणामुळे होणारा टाइप 2 मधुमेह कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅलरी-मुक्त कॅफीनयुक्त पेयांसोबत जोडले जाऊ शकतात. तरीही याबाबत आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.

टाइप 2 मधुमेह हा जीवनशैलीचा विकार आहे जेव्हा शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन (हॉर्मोन्स) तयार करत नाही किंवा त्याच्या उत्पादनास विरोध करते.

जास्त कॉफी पिऊ नका

हे अभ्यास जास्त कॉफी पिण्याबाबत संशोधन करत नाही किंवा तशी शिफारस देखील करत नाही जो या संशोधनामागील हा उद्देश नव्हता, असे डॉ. कॅटरिना कोस यांनी स्पष्ट केले ज्या एक्सेटर विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्याता आणि अभ्यासाच्या सह-लेखिका आहेत.

काय आहे हे संशोधन?

संशोधकांनी मेंडेलियन यादृच्छिकीकरण नावाचे तंत्र वापरले, जे अनुवांशिक पुराव्याद्वारे कारण आणि परिणाम स्पष्ट करते. दोन सामान्य जनुक रूपे कॅफीन चयापचय गतीशी संबंधित असल्याचे आढळले, जे अखेर कमी BMI आणि शरीरातील चरबीशी संबंधित होते.

अभ्यासात असे आढळून आले की, टाइप 2 मधुमेह होण्याच्या धोक्यामध्ये जवळपास निम्मी घट वजन कमी झाल्यामुळे होते आणि कॅफीन, जे चयापचय वाढवण्यासाठी, चरबी कमी करणे आणि भूक कमी करण्यासाठी ओळखले जाते ते या रोगाचा सामाना करु शकते.

रोज संत्री खाल्याने तुमचा तणाव आणि चिंता होऊ शकते दूर? जाणून घ्या

आणखी संशोधनाची आवश्यकता

दररोज १०० एमजी कॅफीनच्या सेवनामुळे वापरल्या जाणाऱ्या उर्जेचे प्रमाण १०० कॅलरीज प्रति दिवशी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकच्या मेडिकल स्कूलमधील सहयोगी क्लिनिकल प्रोफेसर डॉ. स्टीफन लॉरेन्स यांनी नमूद केले की, मेंडेलियन मूल्यांकनाला मर्यादा होत्या कारण त्याबाबत अतिसंवेदनशीलत पूर्वाग्रह होते. भविष्यातील अभ्यास आशादायी उपचार विकसित करू शकतात, असेही ते म्हणाले.

कॅलरीजचे सेवन कमी करण्याचा एक प्रभावी उपाय

तथापि, लेखकांनी या अभ्यासाला त्यांच्या विश्वासाची मोठी झेप असल्याचे म्हटले आहे कारण कॅफिनच्या जास्त सेवनाने वजन कमी केल्याने टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो आणि कॅलरीजचे सेवन कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे.

कॅफीनचे जास्त प्रमाण हे लठ्ठपणावर उपचार आहे की नाही याचा शोध घेतला पाहिजे, असे डॉ लॉरेन्स यांनी अधोरेखित केले.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 13:44 IST