Diy Health Care : थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेकांना कोरड्या त्वचेचा त्रास होतो. कोरडेपणामुळे त्वचेवर काळसरपणा येण्यासह पांढरे पॅच दिसू लागतात. अशावेळी दिवसभर मॉइश्चरायझर लावूनही काही परिणाम दिसत नाही. यात केसांसंबंधित समस्यादेखील वाढताना दिसतात. जसे की केसांचा कोरडेपणा, केस गळती. अशा परिस्थितीत त्वचा आणि केसांची खास काळजी घेणे फार गरजेचे असते. विशेषत: रात्रीच्या वेळी तुम्ही त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी फॉलो केल्यास काही दिवसांतच त्वचा मुलायम, चमकदार होण्यास व केस घनदाट होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही अशा कोणत्या सात महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे याविषयी drmanasiskin.com च्या संस्थापक आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मानसी शिरोलीकर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

१) बेडरुममधील वातावरण नीट ठेवा

जसजसे थंड हवामान सुरू होते, तसतसे घरातील हवा कोरडी होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या बेडरुममधील हवेत आवश्यक आर्द्रता टिकवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा. याच्या वापराने तुमची त्वचा आणि केस कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करता येते. यामुळे एकंदरीत निरोगी आरोग्य ठेवता येते.

These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
facts about emergency contraceptive pills
स्त्री आरोग्य : तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेताय? खबरदारी घ्या!
woman commits suicide dowry marathi news
कल्याण: टिटवाळ्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासर्‍यांसह तीन जण अटकेत
Womens Health Are Breast Lumps Scary
स्त्री आरोग्य : स्तनातील गाठी भीतीदायक?

२) चेहरा व्यवस्थित धुवा

रात्रीच्या स्कीनकेअर रुटीनचा भाग म्हणून सॉफ्ट, हायड्रेटिंग क्लीन्सर किंवा क्लीनिंग लोशनचा वापर करा. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी न करता चेहऱ्यावरील मेकअप आणि अशुद्ध घटक प्रभावीपणे काढू शकता. विशेषत: हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा त्वचा अधिक संवेदनशील असते आणि कोरडेपणाचा धोका असतो, तेव्हा ती अगदी सॉफ्ट पद्धतीने स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

३) रात्रीच्या वेळी स्कीनकेअर रुटीन फॉलो करा

त्वचा हायड्रेटिंग ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी हायलूरोनिक ॲसिड आणि सिरॅमाइड्स घटक असणाऱ्या स्कीन केअर प्रोडक्टचा वापर करा, यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासह मदत होते. तसेच जास्त काळ त्वचेतील हायड्रेशन टिकून राहते. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी तुम्ही शिया बटर आणि ओटमील असलेले स्कीन केअर प्रोडक्ट वापरू शकता. रात्रीच्या योग्य स्कीन केअर रुटीन फॉलो केल्यास संपूर्ण हिवाळ्यात त्वचेचे निरोगी आरोग्य राखू शकता.

४) त्वचेला मॉश्चराइझ करण्यास विसरू नका

अंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी ओलसर त्वचेवर बॉडीलोशन लावायला विसरू नका. फक्त चेहराच नाही तर इतर त्वचेचीसुद्धा योग्य काळजी घ्या. कोपर आणि गुडघे यांसारख्या जास्त कोरडेपणा जाणवणाऱ्या भागात लोशनचा वापर करा. यासाठी तुम्ही रिच हँड क्रीमचा वापर करू शकता. तसेच रात्रभर कॉटनचे हातमोजे आणि पायमोजे वापरा, विशेषतः हिवाळ्यात जाणवणारा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.

५) केसांना कंडिशनिंग करा

रात्री झोपण्यापूर्वी लिव्ह-इन कंडिशनरच्या मदतीने केसांचे कंडिशनिंग करा. झोपण्यापूर्वी तुम्ही असे केल्यास केसांना योग्य पोषण मिळते, शिवाय ते तुटण्यापासून रोखता येतात. तसेच केस मुलायम आणि घनदाट होतात. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकदा केस खूप कोरडे आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कंडिशनिंग ट्रीटमेंट हा एक चांगला पर्याय असू शकतो.

६) कोमट पाण्याने अंघोळ करा

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताना बरे वाटते, परंतु यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि होणारी जळजळ रोखण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करा. यातून आपली त्वचा हायड्रेटेड राहील याची खात्री करा.

७) लिप बाम वापरा

झोपण्याआधी ओठांना हायड्रेटिंग लिप बाम लावा. स्कीनकेअर रुटीनदरम्यान ओठांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, यामुळे ओठ कोरडे होण्यासह भेगा पडल्याने त्यातून काही वेळा रक्त येऊ लागते. विशेषतः हिवाळ्यात लिप बामचा वापर करून तुम्ही ओठ मऊ आणि गुळगुळीत ठेऊ शकता.