मैत्रा (वयवर्षे -२५) : आमच्या ऑफिसमधून मी मॅरेथॉनसाठी रजिस्टर केलंय. तीन महिने आहेत मला माहितेय. त्यासाठी तयारी सुरु केलीय आणि म्हणूनच डाएट हवाय. म्हणजे मला असं काही धावण्याचं इतकं वाटत नाही. मी नियमित व्यायाम करतेय गेली अनेक वर्ष, यावर्षी म्हटलं थोडं धावणं सुरु झालं तर तेवढंच मोटिव्हेशन!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी : तुझा ईसीजी , ब्लड टेस्ट केल्यात का ?

मैत्रा : साधी मॅरेथॉन आहे. ४२ किलोमीटर नाही, अगं .

मी : हो . पण हे रिपोर्ट आले तर आपल्याला नेमका डाएट पण प्लान करता येईल, त्याप्रमाणे तयारी करू .

हेही वाचा…Health Special : शालेय वयातील वाढ आणि मनोविकास

वजन आणि तंदुरुस्ती

विनीत (वयवर्षे ३५): आयटी कंपनी मध्ये इंजिनीअर. नियमित व्यायाम करणारा.

विनीत: गेली दोन वर्षे मी नेटाने मॅरेथॉनसाठी तयारी करतोय . गेल्या दोन वर्षात दोन हाफ मॅरेथॉन पूर्ण करून नियमित धावण्याचं तत्त्व पाळून आहे. त्यानिमित्तानं वजन आणि तब्येतीत कमल फरक झालेला आहे.

कार्डिअॅक टेस्ट्स

विनीत : मी गेली काही वर्ष आहारनियमन केलं होतं. यावर्षी फोकस पूर्णपणे स्वतःवर ठेवला, कारण मला ४२ किलोमीटर पळायचं आहेच आणि पुढच्या दोन वर्षांत ‘आयर्नमॅन’साठी उतरायचं आहे. त्यामुळे कसून मेहनत करायची आहे

मी: रिपोर्ट्स ?

विनीत : नेहमीप्रमाणे मी यावेळी सगळ्या कार्डिअॅक टेस्ट्स केल्यात . सो लेट्स बिगिन .

आम्ही हसून त्याच्या आहाराकडे वळलो…

हेही वाचा…Health Special: हिवाळ्यात वाढणारा कफ व होणाऱ्या सर्दी- तापामागची कारणे काय?

व्हिटॅमिन्स, लिपिड्स आणि…

मिहीर (वयवर्षे ३७)- सिनिअर मार्केटिंग मॅनेजर

मिहीर- मी गेली तीन वर्ष हाफ मॅरेथॉन पळतोय. यावर्षी फूल मॅरेथॉन धावायचा विचार आहे. मी गेल्या वर्षी प्रयत्न केला होता पण मला जमत नाहीये. यावर्षी मी व्यायामात बदल केलाय आणि आता आहारावर सुद्धा कसोशीने लक्ष द्यायचं आहे. थोडं वजन कमी- जास्त होत असतं, पण मला माहितेय ४२ किलोमीटर माझ्यासारख्या बैठं काम करणाऱ्याला चॅलेंजिंग होतं. त्यातून घरी फुल्लमिल इज मस्ट! त्यामुळे मला असं डाएट हवंय ज्यात मला सगळं खाऊन नीट सशक्तपणे मॅरेथॉन धावता येईल .

मी: मी सांगितलेले रिपोर्ट्स ?

मिहीर: नेक्स्ट वीक करतो. जरा आठवडाभर नीट करतो सगळं, चालेल ना ?

मी : तुमची फॅमिली हिस्ट्री पाहता फक्त व्हिटॅमिन्सपेक्षा लिपिड्स , ईसीजी रिपोर्ट्स पण मस्ट आहेत आणि सात दिवसांत एकदम काही कमी होणार नाही पण रिपोर्ट्स महत्वाचे आहेत .

मिहीर : आज सोमवार आहे. पुढच्या सोमवारी मी उरलेले सगळे रिपोर्ट्स करतो.

मी: बेस्ट!

कॅल्शियमची कमतरता?

शलाका (वयवर्षे ४०) – मीडिया मॅनेजर

शलाका : मी गेली अनेक वर्ष हाफ मॅरेथॉन पळतेय. पण यावेळी पूर्ण मॅरेथॉनची प्रॅक्टिस करता करता सुद्धा पायात गोळे येतायत. आय डोन्ट वॉन्ट टू मेक इट डिफिकल्ट. कॅल्शिअम कमी झालेलं लास्ट इयर सुद्धा त्यामुळे त्याची काळजी मी घेतेय . पण मी दोनच वेळा जेवते बाकी बंद. आणि मला जमवायचंयं फुल मॅरेथॉन आणि माझे रिपोर्ट्स क्लिअर आहेत . मी कुतूहलानं तिच्या डाएट कडे मोर्चा वळवला…

हेही वाचा...Health Special : सायबर बुलिंग कसं खच्चीकरण करतं? ते झाल्यास काय करायचं?

सिद्धेश (वयवर्षे २४) – इंटर्न

सिद्धेश: मला गंमत म्हणून पळायचंय, त्यामुळे १० किलोमीटरने सुरुवात करेन! आमचा अख्खा ग्रुपच आहे . म्हणजे आम्ही काही तयारी वगैरे नाही केलेली, पण आम्ही क्रिकेट खेळतोय रोज. साधारण D!अॅक्टिव्हिटी सुरूच असते आमची.

मी: हो पण जानेवारी मध्ये पळायचं असेल तर तीन किलोमीटर पळायला सुरुवात करावीच लागेल.

सिद्धेश : अन माझा मित्र म्हणाला की, १० किलोमीटर इझी आहे . म्हणजे इट्स ओके टू वॉक… थोडंसं चाललेलं चालतं.

मी: त्यासाठी पण इतकं अंतर चालायची तयारी केलीच पाहिजे आणि धावण्याची शर्यतीत २४ वर्षाच्या मुलानं तयारीनिशी धावावं असं मला वाटतं. त्यामुळे ब्लड टेस्ट, नियमित सराव आणि वेळेवर झोप या तीन गोष्टी सहज करता आल्या तर इतकं अवघड नाही होणार १० किलोमीटर धावणं.
सिद्धेश : ओके, डन! माझ्याकडे तीन महिने आहेत आणि मी प्रॉमिस करतो मी १० किलोमीटर धावेन. मी उत्साहाने त्याच्या डाएटकडे मोर्चा वळवला .

तयारी कितपत?

साधारण ऑगस्ट महिन्यापासून स्पर्धात्मक शर्यतींमध्ये धावणाऱ्या सगळ्यांनाच मॅरेथॉनचे वेध लागतात. मॅरेथॉन सजग मानसिकतेने धावणारे, मॅरेथॉन हौस म्हणून सतर्कपणे धावणारे आणि ट्रेण्ड म्हणून धावणारे असे या धावणाऱ्यांचे सरसकट तीन प्रकार आहेत. क्रीडापोषण तज्ज्ञ म्हणून याना मार्गदर्शन करताना धावणाऱ्याची मानसिकता लक्षात घेताना “का?” आणि “तयारी कितपत आहे?” हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे ठरतात.

हेही वाचा…Health Special : संथ विषाणूची गोष्ट

खंबीर मन, तंदुरुस्त हृदय

वजन जास्त असणाऱ्या अनेक व्यक्ती धावण्याचं लक्ष्य ठेवलं, तर वजन कमी करता येईल म्हणून अघोरी व्यायाम करताना दिसतात. मॅरेथॉनची तयारी करताना किंवा मॅरेथॉनबद्दल लक्ष्य समोर ठेवताना विनीत किंवा मिहीर सारखं व्यायामसकट आहारनियमन केल्यास मॅरेथॉन धावणं सोपं होऊन जातं. शिवाय मॅरेथॉनसाठी तयार होताना तुमची मानसिकता खंबीर असायला हवी तर शरीर आणि हृदय तंदुरुस्त असायला हवं. कोणताही स्पर्धात्मक व्यायाम करण्याआधी तुमच्या हृदयासाठी आवश्यक चाचण्या करणं अत्यावश्यक आहे. लिपिड प्रोफाइल, मधुमेहासाठी चाचणी, इसीजी, कोलेस्टेरॉल तपासणी, स्वादुपिंडाचे परिमाण, रक्त-तपासणी, कॅल्शिअम, जीवनसत्त्व ड, जीवनसत्त्व ब, लोह, पोटॅशिअम यांचे प्रमाण तुमच्या स्वास्थ्याबद्दल नेमके आडाखे बांधून तयारी करण्यास मदत करू शकत.

तुमच्या रक्तातील हे घटक आणि अवयवांचं तंदुरुस्त असणं तुम्हाला स्पर्धात्मक स्तरावर उत्तम परिणाम देऊ शकतं. मॅरेथॉन हे फॅड नसून तुमच्या स्वस्थ आरोग्याचं दर्शक असतं त्यामुळे केवळ ट्रेण्ड म्हणून धावणं तुमचं स्वास्थ्य बिघडवू शकत हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special desire to run a marathon and necessity of require medical tests hldc psg
First published on: 27-01-2024 at 15:24 IST