कोलेस्ट्रॉल वाढणं आणि त्यानिमित्ताने आहारातील स्निग्ध पदार्थांचं प्रमाण पडताळून पाहून ओघाने आलंच. शरीरासाठी स्निग्धांश आवश्यक आहेत का? याचं उत्तर आहे- अर्थात आहेत. कारण आपल्या प्रत्येक पेशीभवतालचं आवरण हे स्निग्धांशाने तयार झालेलं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा आपोआप रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की हृदयावरचा ताण देखील वाढतो. याबरोबर जर व्यायामाचा अभाव असेल , जीवनशैली शिस्तबद्ध नसेल तर हृदयाचं समीकरण बिघडू शकतं.

‘गेले ३ महिने मी तेल बंदच केलंय. तरीपण कोलेस्ट्रॉल वाढलेलंच आहे. म्हणजे आता काय करायचं नक्की? एकतर मला फॅमिली हिस्टरी आहे हार्टची त्यामुळे सारखी भीती वाटत असते. आता तू मला नीट सांग सगळं. शेवटचा उपाय म्हणून डाएट करून पाहणार आहे मी’, मीराच्या आवाजात त्रासिक कष्ट जाणवत होते.

हेही वाचा…Mental Health Special : मुलांना शिस्त कशी लावाल?

कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणजे तेल बंद, तूप बंद असा जणू नियमच ठरवून टाकलाय. समाज माध्यमांवर देखील ‘नो ऑइल कुकिंग’ चे क्लासेस सुरु असलेलं पाहण्यात आलं होतं. आहरतज्ज्ञ म्हणून काम करताना समाजात नो ऑइल म्हणजे हेल्दी असा एक गैरसमज प्रकर्षानं असल्याचं जाणवतं.

आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. प्रत्येक पेशींचे आवरण हे स्निग्धांशानी तयार झालेले असते. जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा खालील रक्त तपासणी केली जाते.

या रक्त तपासणीमध्ये केवळ संपूर्ण कोलेस्ट्रॉल नव्हे तर कोलेस्ट्रॉलसाठी कारणीभूत असणारे विविध स्निग्धांशाचे प्रमाण मुख्यत्वे कारणीभूत असते.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून हृदयाचे आरोग्य बिघडण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे :

-जेवणाच्या चुकीच्या वेळा ( अतिरेकी खाणे / अवेळी खाणे )

-आहारातील साखरेचे अतिरेकी प्रमाण ( जेवणानंतर गोड पदार्थ खाणे/ बेकरी पदार्थ अतिरेकी प्रमाणात खाणे)

-आहारातील तेलाचा चुकीचा वापर

-एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे , तळलेले पदार्थ खाणे , आहारात रेडी टू कुक पदार्थांचे प्रमाण जास्त असणे, तेलकट रसदार पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

हेही वाचा…Health Special : चपळता वाढवणारं ट्रेनिंग का आवश्यक?

-वनस्पतीजन्य स्निग्धांशाचे अतिरेकी प्रमाण

-सनफ्लॉवर तेल, कनोला , मक्याचे तेल , बटर यांचा नियमित वापर)

-साठवून ठेवलेल्या स्निग्धांशाचे अतिरेकी प्रमाण

-चीझ , मार्गरिन , साठवून ठेवलेले मांसाहारी पदार्थ , डालडा , क्रिम इत्यादी

कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी साठवणीचे तेल किंवा तेलकट पदार्थ हा महत्वाचा घातक घटक मानला जातो. उदाहरणादाखल आपण बटर तयार करण्याची प्रक्रिया पाहूया.

बटर तयार करताना त्यावर जास्तीची उष्णता , अतिरिक्त हवेचा दाब आणि हायड्रोजन कॅटॅलीस्टचा एकत्रित परिणाम स्निग्धांशाची घनता वाढवितो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेलाचे अणू घट्ट होत जातात. तेलाची ही घनता वाढताना त्यातील ट्रान्स फॅटी ऍसिड्सचे प्रमाण वाढत जाते. ट्रान्स फॅट्स शरीरातील अनावश्यक स्निग्धांशाचे प्रमाण वाढवतात. वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला गेलं तर हे स्निग्धांश प्लास्टिक इतकेच शरीरासाठी हानिकारक ठरतात.

ज्याप्रमाणे अतिरिक्त साखरेचे प्रमाण शरीरासाठी नुकसानकारक ठरते तसेच अतिरेकी स्निग्धांश शरीराचे नुकसान करू शकतात. आहारातील स्निग्धांशाचे प्रमाण जीवनसत्त्वांचे व्यवस्थित शोषण करून शरीराच्या जडणघडणीत महत्वाचे काम करतात. स्निग्धांश जितके नैसर्गिक स्वरूपात खाल्ले जातील तितके ते शरीरासाठी पोषक परिणाम देतात.

हेही वाचा…Health Special : मायग्रेनचं दुखणं टाळण्यासाठी हे कराच… 

त्यामुळे तूप , खोबरेल तेल, तेलबियांपासून तयार केले जाणारे तेल आहारात असेल तर उत्तम परिणाम दिसून येतात. याच लेखमालिकेत पुढच्या भागात आपण छुप्या तेलाबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल जाणून घेऊया .

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why cholesterol increase in body hldc psg