रेस्टरुम मध्ये त्रासिक चेहऱ्याने वेदिका झोपली होती. बरं नाहीये का? मी विचारलं, ‘नेहमीचंच, मायग्रेन. काहीही केलं तरी थांबत नाही’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काही खाल्लयंस का ? आताच चहा प्यायलेय आणि जॅम सँडविच खाल्लं.

म्हणजे औषध, मी हसून म्हटलं.

‘तुला आता सरकॅझम सुचतोय ? नॉट अ गुड टाईमिंग’, वेदिकाने चिडून म्हटलं.

‘सॉरी. पण माझं ऐकशील ? थोडंसं पाणी पी आणि उपमा किंवा पोळी भाजी खाऊन घे. आणि आराम कर’

बोलता बोलताच मी माझ्या डब्यातला उपमा आणि पोळी भाजी दोन्ही पर्याय तिच्यासमोर ठेवले. यावर काहीशा नाराजीने का होईना वेदिका उपमा खायला तयार झाली.

‘मला महिन्यातून एकदा मायग्रेनचा त्रास होतोच. इतकी सवय झालीये डोकेदुखीची’

तू नाश्ता करतेस का?

‘हो तर! चहा -बिस्कीट तरी खाऊन निघते मी’, वेदिका म्हणाली.

नाश्ता म्हणजे ताजा नाश्ता. आपण थोडंसं तुझ्या डाएटवर काम करूया.

वेदिकाच्या आहारावर काम करताना मला लक्षात आलं की वेदिकाचा केवळ आहारच नव्हे तर दिवसभरातलं काम आणि ताण यांचा थेट संबंध तिच्या मायग्रेनशी आहे.

हेही वाचा : तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच

अलीकडे अर्धशिशी म्हणजेच मायग्रेनचा त्रास होणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसतात किंवा ऐकिवात असतात. अर्धशिशी किंवा मायग्रेन कशामुळे होतो ?

-झोप अपुरी होणे

-उच्च रक्तदाब असणे

-अतिप्रखर प्रकाशाच्या सातत्याने सान्निध्यात असणे

-सातत्याने आवाज असणाऱ्या ठिकाणी असणे

-उपासमार होणे

-सातत्याने शिळे अन्न खाणे

-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची औषधे खाणे

-अंगदुखीच्या गोळ्या घेणे

-शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडणे

-अनुवांशिक अर्धशिशी असणे

यात देखील काही जणांना मायग्रेन सुरु होण्याआधी थोडा वेळ लक्षात येतं आणि मायग्रेन सुरु होतं. डोकेदुखी सुरु होते आणि कधी कधी शरीरावरील तोल देखील जातो. अनेक जणांना चक्कर येते आणि काही वेळाने शुद्ध आल्यावर तीव्र डोकेदुखी सुरु असते.

हेही वाचा : मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

मायग्रेनच्या बाबतीत आहार अत्यंत महत्वाचा घटक आहे.

-तहान लागल्याशिवाय पाणी न पिणे

-भरपूर आंबट किंवा तुरट पदार्थ खाणे

-सातत्याने गोड पदार्थ खाणे

-आहारातील आवश्यक स्निग्ध पदार्थ कमी करणे

-शिळे किंवा साठवणीचे पदार्थ खाणे

-आहारात सातत्याने खारट पदार्थ आणि चुकीचे स्निग्ध पदार्थ वापरणे

-तळलेल्या मांसाहाराचे प्रमाण जास्त असणे

-खूप जास्त वेळ उपाशी राहणे किंवा उपवास करणे

-अर्धशिशी कमी करण्यासाठी वरील गोष्टी जाणून घेऊन त्यावर तात्काळ काम करणे आवश्यक आहे.

मायग्रेन होतंय म्हणून चहा किंवा कॉफी पिणे विषारी ठरू शकते. तुमच्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला उत्तम पोषणाची आवश्यकता असताना चहा किंवा कॉफी पिणे अर्धशिशीचा त्रास दुपटीने वाढवू शकते.

त्यामुळे नियमित आहार. विशेषतः सकाळी उठून तेलबिया नियमितपणे खाणे अतिशय उपयुक्त ठरू शकते.

-अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी आहारात १ चमचा तूप नियमितपणे ठेवावे.

-शक्यतो पापड, लोणचं , साठवणीचे खारे पदार्थ, सुकामेवा यांचे सेवन टाळावे.

-आहारात डाळिंब, सफरचंद, पेर यासारख्या फळांचा आवर्जून समावेश करावा.

हेही वाचा : तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र

-शक्यतो साठवणीच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो त्यामुळे खूप वेळ साठवून ठेवलेले चीज, पनीर ,आंबट दही यापासून लांब राहावे.

-ताजे अन्नपदार्थ न खाता शिळे किंवा खूप जुने अन्य खाणे शिवाय बेकरी पदार्थांचे खूप जास्त सेवन करणे यामुळे मायग्रेन वाढू शकतो.

-टोमॅटो लिंबू आवळा यांचे आहारातील प्रमाण माफक असावे.

-आहारातील प्रथिने आणि फॅट्स याकडे लक्ष देऊन त्यांचे योग्य प्रमाणात सेवन मायग्रेन पासून रक्षण करू शकते.

मायग्रेनसाठी कोणताही शॉर्ट कट किंवा तात्पुरते उपाय करण्यापेक्षा आहारातील साधे सोपे बदल तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकतात.

दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिणे ,वेळेवर म्हणजेच भूक लागण्याआधी ताजे अन्न किमान २ वेळा जेवणे आणि उत्तम झोप या त्रिकुटाच्या योग्य नियोजनाने अर्धशिशीवर मत करता येऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to avoid the pain of migraine with a healthy diet hldc css
First published on: 29-02-2024 at 13:46 IST