डॉक्टरांकडे तुम्ही रोजच्या तपासणी गेलेले असताना मध्ये जर तुमचे ब्लडप्रेशर वाढलेले मिळाले तर काय करावे? ब्लडप्रेशर वाढलेले आहे, म्हणून घाबरुन जाऊ नये. कारण ब्लडप्रेशर वाढले आहे,म्हणजे लगेच तुम्हाला काही त्रास झाला; असे सहसा होत नाही.मात्र त्याकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करु नये. महत्त्वाचे म्हणजे “आत्ता मी चालून आलो म्हणून, आज जरा ऑफ़िसमध्ये वादावादी झाली म्हणून, आज घरी थोडे भांडण झाले म्हणून ब्लडप्रेशर वाढले असेल ’, अशाप्रकारे या किंवा त्या कारणामुळे ब्लडप्रेशर वाढले असेल असे तर्क लढवत बसू नका.
आता प्रश्न हा आहे की खरोखरच तुम्हाला उच्च-रक्तदाबाचा (हाय-ब्लडप्रेशरचा) त्रास आहे का? एकाच तपासणीमध्ये रक्तदाब वाढलेला मिळाला म्हणून सहसा उपचार सुरु केला जात नाही. अर्थात ब्लडप्रेशर मर्यादेच्या बाहेर वाढलेले असेल ; म्हणजे सिस्टॉलिक(वरचा आकडा) १८०च्या वर आणि डायस्टॉलिक (खालचा आकडा) १२० च्या वर असेल; तर मात्र ताबडतोब उपचारांची गरज लागेल. कसेही असले तरी तुम्हाला त्वरित औषधांची गरज आहे वा नाही याचा निर्णय तुमचे डॉक्टर घेतीलच.

अन्यथा एकाच वेळी ब्लडप्रेशर तपासून तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण आहात, हा निर्णय घेता येत नाही. तुम्हाला हाय-ब्लडप्रेशरचा त्रास आहे, हे निश्चित करण्यासाठी नियमितपणे काही दिवस ब्लडप्रेशर तपासायला हवे. आपल्याला खरोखरच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का याची खात्री करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या वेळी म्हणजे कधी सकाळी तर कधी सायंकाळी, तर कधी उशिरा रात्री याप्रकारे काही दिवस ब्लडप्रेशर तपासावे. कारण ब्लडप्रेशर कोणत्या वेळी वाढते व कोणत्या वेळी वाढत नाही हे जाणून घेणे उपचाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. तसेच ब्लडप्रेशर वेगवेगळ्या जागी; कधी एका डॉक्टरांकडे तर कधी दुस~या डॉक्टरांकडे किंवा शक्य असल्यास कधी घरी सुद्धा तपासावे.

sweet potato kachori recipe
उपवासाला वरई, साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग नक्की करून पाहा रताळ्याची चटपटीत कचोरी
Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!

वाचा- अति पाणी प्यायल्यानेही प्रकृतीला धोका

नियमितपणे ब्लडप्रेशर तपासल्यानंतर जर ब्लडप्रेशर वाढलेलेच मिळत असेल तर मात्र आपल्या भविष्यासाठी (खरं तर जीवितासाठीच) ती धोक्याची घंटा वाजली आहे असे समजून उपचाराकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, कारण उपचार न केलेला उच्च रक्तदाब हे अनेक गंभीर आजारांमागचे मूळ कारण असते.