Holi Skin Care Tips : होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा रंगांचा खेळ आहे. लोकं एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात, पण रंग खेळताना त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. रंगाच्या हानिकारक परिणामांपासून त्वचा आणि केस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होळीपूर्वी आणि होळीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने त्वचेची काळजी कशी घ्यायची, याविषयी माहिती सांगितली आहे.

रंग खेळण्यापूर्वी त्वचेची कशी काळजी घ्यावी?

ज्युसी केमिस्ट्रीच्या सह संस्थापक आणि सीओओ (COO) मेघा आशर चेहऱ्याला तेल लावण्याची योग्य पद्धत सांगतात. “तेलामुळे त्वचेवर अडथळा निर्माण होतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही चेहऱ्याला रंग लावता तेव्हा रंग त्वचेच्या आत जाऊ शकत नाही आणि चेहरा धुतल्यानंतर रंग लवकर निघतो.”

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो

मेघा आशर पुढे सांगतात, “जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही अर्गन आणि जोजोबा (argan or jojoba) तेल वापरावे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर द्राक्षांच्या बियांचे तेल वापरावे. हे तेल लहान मुलांच्या त्वचेसाठीसुद्धा चांगले आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही रंग खेळायला घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन लावा.”
ISAAC Luxe च्या संस्थापक डॉ. गितीका मित्तल सांगतात, “होळी खेळताना लूब्रिकेंट आय ड्रॉप वापरा. डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरा आणि ओठांवर पेट्रोलियम जेली लावा.”

हेही वाचा : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो ह्रदयाची काळजी घ्या! संशोधनातून आली धक्कादायक माहिती

रंग खेळल्यानंतर त्वचेची कशी काळजी घ्यावी?

  • होळीला रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा रसायनयुक्त रंगांमुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. डॉ. गितीका मित्तल यांनी रंग खेळल्यानंतर त्वचेला कोणतीही इजा होऊ नये म्हणून काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
  • क्लिंझरने चेहरा धुवा. चेहरा घासू नका. थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही खोबरेल तेल किंवा मायसेलर पाण्याचा वापर करा.
  • त्वचेला कोरफड जेल लावा
  • रंग खेळल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा त्वचेवर लालसरपणा आला असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.
  • कॅमोमाइल चहानेसुद्धा चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो.
  • त्वचा कोरडी होऊ नये म्हणून रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर भरपूर पाणी प्या.
  • होळीच्या पूर्वी आणि नंतर चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक अॅसिड आणि नियासिनॅमाइड याशिवाय कोणतेही पदार्थ लावू नका.