डॉ. शशांक सामक व डॉ. जेसिका सामक
Sex and Relationship for Marriage आनंद-आनंदी केस ही जरा वेगळी एवढ्याचसाठी होती की, वाट पाहून पाहून आनंदीने माझ्यासमोरच आनंदला ठणकावले की, घरी वारंवार उपाशी ठेवलं गेलं तर माणूस हॉटेलची वाट धरतो हे लक्षात ठेव. सेक्स हा माझा लग्नसिद्ध अधिकार आहे आणि तो तू नाकारता कामा नये. नाही तर तू लग्नच करायला नको होतं. तू माझा हा अधिकार नाकारलास तर मला माझं आयुष्य आनंदात घालवायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेव. आनंदीचं हे धारिष्ट्य आणि मनीषाची सोशिकता या दोन्ही गोष्टींनी मला अंतर्मुख केले!
होमोसेक्शुआलिटी?
खरे तर माझ्याकडे आलेल्या दोन्ही केसेस सेक्स-काउन्सेलिंग काय व सेक्स-थेरपी यांच्या साहाय्याने सुटायला पाहिजे होत्या. पण सेक्ससाठीचा पुढाकार मनीष व आनंद दोघा नवऱ्यांकडून घेतला जात नव्हता ही फॅक्ट होती. (अर्थात इथे आम्हा सेक्सॉलॉजिस्टना ‘होमोसेक्शुआलिटी’चा विचारही करावा लागतो. मनीष व आनंद दोघांकडून अर्थातच अशी हिस्ट्री मिळाली नव्हती. मी त्यांना एकेकट्यांना विचारूनसुद्धा! पण कमीजास्त प्रमाणात त्याचे अंश असू शकतातही!).

लग्नामधील सेक्सची जबाबदारी

खरं म्हणजे अशा केसेस पाहिल्या की विवाहपूर्व काउन्सेलिंग किती आवश्यक असते हे सर्वांच्याच लक्षात येईल.
लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात आरोप-प्रत्यारोपांचे रान उठवले जाते. जोडीदाराला कमीपणा दिला जातो. ‘इम्पोटन्स’, ‘फ्रिजिडिटी’ वगरे ब्रिटिश काळातील आणि आता आधुनिक सेक्सॉलॉजीतील कालबाह्य शब्द वापरले जातात. इगो दुखावून नाती फारच कडवट केली जातात. वकिलांची चलती आणि दाम्पत्याची फरफट बराच काळ होत राहते.

नवविवाहितांचे प्रॉब्लेम्स

खरे म्हणजे नवविवाहितांचे सेक्सविषयक सर्व प्रॉब्लेम हे कोर्टापेक्षा सेक्सॉलॉजिस्टच्या कक्षात सोडवता येऊ शकतात. मात्र त्यासाठी संबंधित जोडप्याचे मन:पूर्वक सहकार्य आवश्यक असते. ते त्या जोडप्यातील कोण्या एकाकडून मिळत नसल्यास मात्र आपला सेक्सचा ‘लग्नसिद्ध अधिकार’ मिळवायला दुसरी व्यक्ती मुखत्यार असते. मग व्यथित जोडीदाराकडून घटस्फोट किंवा ‘समाजदेखलं जुजबी’ लग्न टिकवण्यासाठी विवाहबाह्य मैत्रीसंबंध हे पर्याय निवडले जाऊ शकतात. आणि या साऱ्यासाठी त्या व्यथित जोडीदाराला दोष देण्यापेक्षा आपणच त्याला जबाबदार आहोत याची जाणीव संबंधित आडमुठय़ा जोडीदाराने ठेवणे आवश्यक आहे.

कामनिराशेतून आत्मघात

क्वचित प्रसंगीच व्यथित जोडीदार सहनशीलतेचा मार्ग स्वीकारून सर्व काही आलबेल असल्याचा आव आणतो. पण अशांवर पुढे कामजीवनाच्या वैफल्याने, शून्यतेने व्यक्तिमत्त्वावर, मानसिकतेवर निश्चितच परिणाम होऊन स्त्रियांमध्ये ओव्हरीचे, पाळीचे त्रास, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर व्याधीही उद्भवू शकतात. या कामनिराशेतून आत्मघातासारखेही प्रयत्न अशा ‘सहनशील’ व्यक्तीकडून होऊ शकतात. म्हणूनच कामजीवनात अशी सहनशीलता अनाठायीच नव्हे तर मूर्खपणाचीही असते हे अशांनी ध्यानात ठेवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवविवाहितांच्या लैंगिक समस्या

दाम्पत्यातील व्यक्तीसंबंधातील लाज, राग, संताप, चीड, तिरस्कार इथपासून सेक्सच्या विषयीची शरम, घृणा, अनभिज्ञता, भीती, काळजी यांसारख्या विविध कारणांचा समावेश नवविवाहितांच्या लैंगिक समस्यांमध्ये होतो. समलिंगी आकर्षणाचा प्रभाव हेही कारण तसे विरळ नाही. परंतु या सर्व कारणांचा अभ्यास करून ती दूर करता येतात. यासाठी ‘सेक्सॉलॉजी’ या आधुनिक वैद्यकीय स्पेशिआलिटीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ‘सेक्स व रिलेशनशिप’ काउन्सेलिंग आणि ‘सेक्स थेरपी’ म्हणजे लैंगिक समस्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शक ट्रेनिंग प्रोग्रम हेच महत्त्वाचे असतात. सरकारलाही याचे महत्त्व कळल्याने आणि संसार विस्कटून टाकण्यापेक्षा त्यांना तो सावरायला शिकवणे हे समाजस्वास्थ्याला उपकारक असते हेही जाणवल्याने फॅमिली कोर्टात ‘काउन्सेलिंग’चे सेशन्स त्या जोडप्याला देण्यावर भर दिला जातो ही अत्यंत स्पृहणीय गोष्ट आहे. (यापूर्वी चतुरंग पुरवणीमध्ये १६ मार्च २०१३ रोजी प्रकाशित झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)