माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या अंकिताला पाहून मी चकितच झाले. शाळेत बांधेसूद असलेली अंकिता अतिशय जाड व बेढब झाली होती. पूर्वीच्या सौंदर्याचा तर मागमूस नव्हता. चेहऱ्यावर नको तिथे लव दिसत होती व त्वचा, केस अतिशय कोरडे दिसत होते. तिला विचारले तर तिचा महिना देखील बरोबर येत नव्हता. चौकशीनंतर असे लक्षात आले की कॉलेज मध्ये नाश्ता व जेवण हे जंकफूडच होते. असे हे जंकफूड योग्य की अयोग्य?

बदललेल्या जीवनशैली बरोबरच बदललेल्या आहाराच्या सवयीच त्याला कारण आहेत. जंकफूड न खाणारी व्यक्ति शोधून मिळणे कठीण ठरेल इतक या जंकफूडने समाजाला अंर्तबाहय व्यापून टाकलेलं आहे. सध्या तर जंकफूड जिथे मिळतं, तिथे माणसांची गर्दी दिसलीच पाहिजे, इतक हे स्वाभाविक झालं आहे. त्याचं कारण आहे गरमगरम, चटपटीत, भूक उद्दीपीत करणारी व जिभेवर रेंगाळणारी चव हे जंकफूडचे स्वभावविशेष. यामुळे एखाद्या साथीसारखे जंकफूडचे हे आकर्षण समाजातील विविध थरांमधून म्हणजे निरक्षरापासून उच्चशिक्षितांपर्यंत व लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच आपलसं करत आहे.

tejashri pradhan premachi goshta Sagar will prove Mukta innocent in front of everyone
Video: सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावणार, मुक्ताला पुराव्यानिशी सर्वांसमोर निर्दोष सिद्ध करणार
Methi bombil recipe in marathi
कोळी पद्धतीची जबरदस्त स्वादिष्ट अशी “मेथी बोंबील” रेसिपी; एकदा खाल तर खातच रहाल
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
spring season marathi news, spring season health tips marathi
Health Special: वसंत ऋतू आल्हाददायी, तरीही आरोग्यासाठी काळजीचा; असे का?

असे जंकफूड पाहिले तर भूक नसताना सुद्धा आपण ते तोंडात टाकायला लागतो. ‘जंकफूड इतक्या झपाट्याने लोकप्रिय का झाले ? जंकफूड लोकप्रिय व्हायचे कारण आहे त्याची सहज उपलब्धता, चमचमीत चव, आकर्षकता , व खिश्याला सहज परवडणारी किंमत.

फास्टफूडच्या दुकानामधील बर्गर्स, तळलेले बटाट्याचे काप, कार्बोनेटेड शीतपेये, आईसक्रीम, बेकरी मधील कुकीस, केक, बिस्किटे , आकर्षक वेष्टनातील तळलेले पदार्थ, वेफर्स, वडापाव , पावभाजी, पिझ्झा दाबेली , विविध चायनिज पदार्थ असे सर्व प्रकारचे जंकफूड आज सहज उपलब्ध आहे.

आणखी वाचा: Health special: मुलांना विकार आणि आजारांपासून दूर कसे ठेवाल?

जंकफूडचा शब्दश: अर्थ आहे सत्वहीन अन्न. ज्यामध्ये अतिप्रमाणात चरबीयुक्त पदार्थ (स्निग्धांश), साखर आणि उष्मांक (कॅलरीज) असतात आणि प्रथिने, जीवनसत्व, चोथा याचे प्रमाण नगण्य असते. जंकफूडचे पोषण मूल्य अगदी कमी किंवा शून्य असते. त्यामुळे निरुपयोगी अश्या कॅलरीज अतिप्रमाणात शरीराला पुरवल्या जातात.व शरीराला स्थूलपणा येतो. भारतीय संस्कृतीच्या चौरस आहाराला दूर ठेऊन जंकफूडला आपलेसे केल्यामुळे सध्या पोटाच्या विकारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. शिवाय जंकफूडमध्ये अतिप्रक्रीया केल्याने व केमिकल्स वापरल्याने शरीरावर घातक दुष्परिणाम होतात.

या जंक फूड मुळेवजन वाढणे, शरीराचा आकार बेढब बनणे, केस, त्वचा, डोळे यांना शुष्कता येणे, त्यामुळे केस गळणे, केस अकाली पिकणे इ. दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. लठ्ठपणामुळे चार चौघांत वावरण्याचा आत्मविश्वासही कमी होतो.

आणखी वाचा: Health Special: लोणची चवदार, पण प्रमाणातच, अन्यथा…

मनामध्ये, शरीरावर एक प्रकारचा सुस्तपणा दाटून राहतो. जंकफूड कितीही खाल्ल तरी ते भूक भागवत नाही, तर भूक उद्दीपीत करत राहत. मैद्याचा वापर करुन बनवले गेलेले पदार्थ पोटात गॅसेस बनवतात, पचनक्रीया मंदावतात शिवाय या जंकफूड मध्ये तंतुमय पदार्थ जवळ जवळ नसतातच त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठ व त्याचे उपद्रव सुरु होतात. तेलकट व चमचमीत खाद्यपदार्थामुळे पोटात व छातीत जळजळ होऊन असिडीटी, पोटदुखी उद्भवते. जंकफूड मध्ये जास्त प्रमाणात आम्ल व खारटपणा यांचा वापर असतो यामुळे शरीरह्रासाची प्रक्रिया जलद होते. म्हातारपण लवकर येतं.

गोडपदार्थातील अतिरिक्त साखर शरीराला आळशी, निरुत्साही बनविते, चयापचय क्रियेवर देखील याचा विपरीत परिणाम होतो. जंकफूडमुळे शरीराला हवी असलेली जीवनावश्यक जीवनसत्वे व जीवनरस उपलब्ध होत नाही त्यामुळे शरीराची वाढ खुंटते. मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. नैराश्य, विस्मृती या सारखे आजार सुरु होतात. सतत फास्टफूड खाण्यात आल्यास त्या मध्ये असलेल्या काही द्रव्यामुळे तसेच चायनीज पदार्थात वापरण्यात येणाऱ्या अजिनोमोटोमुळे (ह्याचा वापर वादग्रस्त आहे) मुलांमध्ये देखील एकाग्रतेचा/आकलनशीलतेचा अभाव, दुर्बल स्मरणशक्ती व अभ्यासात अनेक अडचणी उद्भवू शकतात.

जंकफूडमधील; तळण्याच्या प्रक्रीयेमुळे ट्रांसफॅट सारख्या हानीकारक पदार्थांची निर्मिती होत राहते – ज्यामुळे भविष्यात मधुमेह, ब्लडप्रेशर, ह्रीदयरोग, अलर्जी, पित्त वगैरेसारखे आजार होऊ शकतात. हे पदार्थ चविष्ट असल्याने रोजचा पोषक आहार आवडेनासा होतो. या पदार्थांमधील घटकांची मेंदूला आवड निर्माण होते व जणूकाही एक प्रकारची व्यसनाधीनता निर्माण होते.

मग जंकफूड अजिबात खाऊ नये का?
खरं सांगायचं तर जंकफूड खावे पण प्रमाणात ! आठवड्यातून एखादेवेळी जंकफूड खायचं असा नियम पाळू शकता किंवा जंकफूड खायचे असल्यास इतर वेळी पोषक अन्न (कडधान्य, चोथा भरपूर असलेली सॅलेडस, फळे, पालेभाजी, इ. ) आपल्या आहारात घेऊ शकता. जंकफूड खाताना थोडासा विचार करावा, या पदार्थाने माझे वजन विनाकारण खूप वाढेल का? मला यातून काही प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय घटक मिळू शकतील का? हे लक्षात घ्यावे.

मग त्यातल्या त्यात जंक फूड कसे निवडावे?
खाण्याचा पदार्थ डोळ्यांना, नाकाला, मनाला व जिभेला तृप्ती देणारा नक्कीच असावा.
पदार्थ तयार करताना व तो आपल्या पर्यंत येईपर्यंत – स्वच्छता आहे की नाही ते पहावे
त्या पदार्थाची पोषकता पहावी. – मैद्याऐवजी गव्हाचा वापर असावा. प्रथिने (अंड, मासाहारी किंवा पनीर, चीज व डाळी यांचा समावेश), व आवश्यक तेवढे फायबर आहेत का ते पाहावे.
अजिनोमोटो घातलेले पदार्थ टाळावेत
तळलेल्या पदार्थापेक्षा बेक केलेले किंवा उकडीचे पदार्थ खावेत.
शीतपेये घेण्यापेक्षा कमी साखरेचे कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घ्यावे.
आपला वेळ वाचविण्यासाठी मुलांना खाऊ म्हणून जंकफूड मुळीच देऊ नये.
एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की आपला तरुणवर्ग पोटाच्या व तत्सम बऱ्याच विकारांनी ग्रस्त आहे. त्याचे कारण आहे सदा सर्वकाळ खाल्ल जाणारे जंकफूड! म्हणूंच सावधान!