Early Signs Of Kidney Stone: जगभरातील प्रौढांमध्ये आढळणारा किडनी स्टोन हा आजार गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्येही अगदी सामान्य झाला आहे. किडनी स्टोन हा ताप खोकल्याप्रमाणे पटकन लक्षात न आल्याने त्याचे परिणाम आणखी गंभीर असतात. मुतखडा झालेल्या व्यक्तीला होणाऱ्या वेदनांचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. वेळीच उपचार न केल्यास संसर्ग होऊ शकतो. किडनी स्टोन वाळूच्या दाण्याएवढे लहान किंवा गारगोटीएवढे मोठे असू शकतात. किडनी स्टोन जितका मोठा तितकी त्याची लक्षणे अधिक त्रासदायक असतात.

किडनी स्टोन कशामुळे होतात?

शरीर योग्य रीतीने डिटॉक्स होत नसेल तर किडनी स्टोनचा धोका वाढतो. जेव्हा रक्तातील युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्यास किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा हेच युरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात शरीरात जमा होते. हेच क्रिस्टल खडे साचून मुतखडा होऊ शकतो. याशिवाय शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम, ऑक्सलेटमुळे सुद्धा हे क्रिस्टल आणखी कडक होतात. तुम्ही स्वतःला आवश्यकतेनुसार पाणी पिण्याची सवय न लावल्यास तर किडनी स्टोनचा धोका तिथेच बळावतो.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
jeev majha guntala fame saorabh choughule took malvani ukhana
“चव्हाणांच्या चेडवाक केलंय…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम सौरभ चौघुलेचा बायकोसाठी खास मालवणी उखाणा; म्हणाला…
pregnancy early sign
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
Devmanus fame marathi actress Aishwarya Nagesh hosting ipl 2024
‘देवमाणूस’फेम ‘ही’ अभिनेत्री आता करतेय आयपीएलचे सूत्रसंचालन; जाणून घ्या…

काही वेळा हा किडनी स्टोन मूत्राशयाशी जोडणार्‍या नळ्या म्हणजेच मूत्रवाहिनीं अडकून पडतो यामुळे लघवीला समस्या होतात तसेच मूत्रवाहिनीला सूज येऊन आल्याने तीव्र वेदना होतात.

किडनी स्टोनची मुख्य लक्षणे काय?

  • पाठीच्या दोन्ही बाजूला कमी अधिक कालांतराने तीव्र वेदना
  • पोटदुखी
  • लघवीत रक्त येणे
  • मळमळ किंवा उलट्या
  • ताप आणि थंडी वाजून येणे
  • दुर्गंधीयुक्त किंवा फेसाळ लघवी होणे
  • लघवी करताना जळजळ होणे

जर तुमच्या आहारात प्रथिने, सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असेल तर किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असल्यास तुम्ही अतिरिक्त सोडियम शरीरात ढकलत असता. जर हे घटक तुमच्या किडनीला फिल्टर करता आले नाहीत तर शरीरात त्याचे कॅल्शियमच्या खड्यांमध्ये रूपांतर होते. लठ्ठपणा, उच्च बॉडी मास इंडेक्स (BMI), अनुवंशिकता आणि काही वैद्यकीय परिस्थिती सुद्धा किडनी स्टोनचे कारण असू शकतात.

हे ही वाचा << किडनी निकामी होण्याची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; तुमचंही शरीर नेहमी देतं संकेत

चिंताजनक बाब म्हणजे गंभीर प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. मुतखडा झालेल्या सर्व लोकांपैकी निम्म्या लोकांना पाच वर्षांच्या आत पुन्हा किडनी स्टोन अनुभवायला लागतो म्हणून पुरेसे पाणी प्या आणि जीवाला जपा.