Simple Exercise to Lower Back: दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून- आवरून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. त्यात पाठदुखी ही कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी समस्या बनू शकते. तुम्हालाही पाठीत हलके दुखणे सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर वेळीच उपचार करा. एकाच आसनात बराच वेळ बसल्याने पाठदुखी होते. पण, जर ही समस्या तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल तर थोडी काळजी घ्या, कारण ही गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसण्याची योग्य पद्धत गरजेची

शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे ‘पाठीचा कणा.’ मात्र, हाच आधार आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे कमकुवत होत चाललाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पाठदुखी ही गंभीर समस्या निर्माण होते आहे. याला एक गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे आपली जीवनशैली. तसेच आपल्या अशा काही सवयी, ज्यामुळे हा त्रास आणखी वाढतो. उदा. बसण्याची चुकीची पद्धत, खूप जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, व्यायामाचा अभाव यांमुळे पाठदुखीची समस्या उद्भवते. सुरुवातीला ही पाठदुखी कमी प्रमाणात असली तरी हळूहळू हे दुखणे वाढत जाते आणि त्याचा ताण आपला मणका, खांदे, हात, मांड्या, पाय यांच्यावर यायला लागतो. हळूहळू ही पाठदुखी इतकी वाढते की, आपल्याला काहीच सुधरत नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. दरम्यान, पाठीचे आरोग्य कसे सुधारू शकते यासंदर्भात आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

खर्चीतून उठून थोडे पुढे सरकायचे. हात खुर्चीच्या पाठीपाशी ठेवायचे आणि कंबर वर उचलून उष्ट्रासन करतो त्याप्रमाणे करायचे. यामुळे पाठीचे स्ट्रेचिंग होते आणि खांदे, पायही बसून अवघडले असतील तर त्याचीही थोडी हालचाल होते. हे स्ट्रेचिंग २० सेकंदांसाठी करायचे.

पाठदुखीसाठी व्यायाम हा रामबाण उपाय मानला जातो. नियमित व्यायाम केल्यामुळे मणक्याचे स्नायू अधिक लवचिक आणि बळकट होतात. परिणामी, पाठीच्या दुखण्यामुळे होणाऱ्या समस्या टाळता येतात. त्यामुळे योगासनं करताना प्रत्येकानं किमान १० सेकंद एका आसनाच्या स्थितीत बसावं. तसेच पाठीचा कणा बळकट करण्यासाठी आसनं किमान दोन ते तीन वेळा करावी.

करा ‘हे’ सोपे उपाय

१. आपल्या पाठीचा कणा सुस्थितीत राहण्यासाठी बसताना किंवा चालताना तो ताठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

२. खुर्चीवरून उठून घरातच वॉक घ्या. मसल्स स्ट्रेच करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल.

३. एकाच जागी जास्त वेळ बसणं टाळा. स्नायूंची हालचाल होण्यासाठी, त्यांना आराम मिळावा म्हणून काम करताना विश्रांती घ्या. मानेची हालचाल करा.

४. पाठीला आधार मिळेल अशाच खुर्चीचा बसण्यासाठी वापर करा.

५. झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.

हेही वाचा >> जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो? काय आहे ‘टच थेरपी’? जाणून घ्या फायदे

६. उंच टाचांच्या, हिल्सच्या चपला, बूट वापरणं टाळा.

७. वजन नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low back pain how to fix your posture and straighten your spine health tips back pain srk
First published on: 18-04-2024 at 15:07 IST