खाद्यपदार्थांच्या पौष्टिकतेबाबत अनेकदा समज-गैरसमज असतात. असेच एक गूढ सोयाबीनबाबतदेखील आहे. सोयाबीन आणि पुरुषांमध्ये आढळणारे हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन यांच्यातील संबंधांबाबत हा समज आहे. इन्स्टाग्रामवर प्रसारित केलेल्या रीलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “सोयाबीनचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.” या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी तज्ज्ञांकडून माहिती घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कार्यात्मक औषध आणि आरोग्यतज्ज्ञ शिवानी बाजवा यांनी सांगितले की, “सोया सेवन आणि पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन पातळी यांच्यातील संबंध हा संशोधकांमध्ये चर्चेचा विषय आहे. सोयामध्ये फायटोएस्ट्रोजेन नावाची संयुगे असतात, जी वनस्पती-व्युत्पन्न पदार्थ आहेत व शरीरातील हार्मोन इस्ट्रोजेनची नक्कल(mimic) करतात.

बाजवा यांनी स्पष्ट केले की, काही अभ्यासामध्ये सुचवले आहे की, ‘फायटोएस्ट्रोजेन पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनसह हॉर्मोन्सच्या पातळीवर संभाव्य प्रभाव टाकू शकतात.”

हेही वाचा – शाहरुख खानला झाला उष्माघाताचा त्रास; वयाच्या पन्नाशीनंतर निर्जलीकरण कसे टाळावे?

वैज्ञानिक पुरावा
बाजवा यांनी सांगितले की, “सध्याचे वैज्ञानिक पुरावे या कल्पनेचे समर्थन करत नाहीत की, सोयाचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. पौंगडावस्थेतून (puberty) जात असलेल्या मुलांसह पुरुषांमधील हॉर्मोन्सच्या पातळींवर सोया सेवनाचे परिणाम अनेक अभ्यासांनी तपासले आहेत आणि मिश्र परिणाम आढळले आहेत. काही अभ्यासांनी उच्च प्रमाणात सोयाचे सेवन केल्यास टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत किंचित घट झाल्याचे सूचित केले आहे, तर इतरांवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम आढळला नाही.

शिवाय सोया सेवनाचे हॉर्मोन्स पातळीवर होणारे परिणाम, किती प्रमाणात सोयाचे सेवन केले आहे, वैयक्तिक चयापचय क्षमता आणि एकूण आहार आणि जीवनशैली यांसारख्या घटकांनुसार बदलू शकतात. याव्यतिरिक्त, सोयाचे संभाव्य हार्मोनल परिणाम दर्शविणारे अनेक अभ्यास आयसोलेडेट सोया कंपाऊंड्स (isolated soya compounds ) किंवा सामान्यत: नियमित आहारात घेतल्या जाणाऱ्या प्रमाणापेक्षा उच्च प्रमाणात सोयाचे सेवन केल्यास निर्माण झाले आहेत, असे बाजवा यांनी सांगितले.

तरी एखाद्याला सोयाचे सेवन करायचे असले तर?
एंकदंर, सर्व प्रकारचे सोया पदार्थांचा माफक प्रमाणात संतुलित आहारात समावेश केल्यास पुरुषांसाठी सामन्यत: सुरक्षित मानले जाते आणि त्याचा टेस्टोस्टेरॉनची पातळीवर लक्षणीय नकारात्मक प्रभाव पडलेला दिसत नाही.

हेही वाचा –“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा

खरं तर, सोयायुक्त पदार्थ जसे की, टोफू, सोया मिल्क हे प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा पौष्टिक स्त्रोत आहे. पण, आहारातील कोणत्याही घटकाप्रमाणेच, संपूर्ण पोषण संतुलन सुनिश्चित करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रतिसादांवर लक्ष ठेवण्यासाठी(monitor individual response) सोयाचे सेवन कमी प्रमाणात आणि विविध आहाराचा भाग म्हणून करणे आवश्यक आहे, असे बाजवा यांनी स्पष्ट केले.

बाजवा यांनी शिफारस केली की,”सोया सेवन आणि टेस्टोस्टेरॉनच्या पातळीबद्दल चिंता असल्यास, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आरोग्य सेवा प्रदात्याशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myth vs fact can eating soya really reduce testosterone snk