Symptoms of Ovarian Cancer: कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे. ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग हा जगभरातील महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. त्याची चिन्हे आणि लक्षणे वेळीच ओळखून त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे. ओव्हेरियन कॅन्सर भारतातील तिसरा सर्वात सामान्य स्त्रीरोग कर्करोग आहे. पण, लवकर निदान झाल्यास ओव्हेरियन कॅन्सरला हरवण्याची शक्यता वाढते आणि बरे होण्याचे प्रमाण वाढते.

अंडाशयाचा कर्करोग समजून घ्या

Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
benefits of turmeric milk and turmeric water
तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
Aarti Aale and Tejas Garge
दीड लाखांच्या लाच प्रकरणात पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात, फरार तेजस गर्गेंचा शोध सुरु
health benefits of kundru
‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो, जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. हे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करू शकते. परंतु, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये याचे निदान केले जाते. स्त्रीरोग ऑन्कोलॉजी, राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथील डॉक्टर सारिका गुप्ता यांनी या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

ओटीपोटात दुखणे: ओटीपोटात तीव्र वेदना होतात, जी मासिक पाळी किंवा पाचन समस्यांशी संबंधित नसतात. महिलांना ओटीपोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येऊ शकते. यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे

वारंवार लघवी होणे : स्त्रियांना सतत लघवीची भावना निर्माण होणे, विशेषतः जर ती कायम राहिली आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

वजन: वजन कमी होणे किंवा दम लागणे आणि त्यामुळे बहुतेकदा अस्वस्थता वाटू शकते. जर ही लक्षणे तीव्रतेत कोणताही बदल न होता आठवडाभरही टिकून राहिली तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तरुण स्त्रियांमध्ये प्रमाण

अंडाशयाचा कर्करोग तरुण स्त्रियांमध्येदेखील आढळून येतो. पण, लवकर निदान केल्याने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अंडाशयाच्या कर्करोगाची वेळीच तपासणी केल्याने उपचार व परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते आणि जगण्याचा दर वाढतो. अंडाशयाचा कर्करोगासाठी वय आणि कौटुंबिक इतिहास यांसारख्या काही घटकांवर नियंत्रण ठेवता येत नसले तरी त्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करता येऊ शकते

काय शस्त्रक्रिया आणि उपचार आवश्यक आहेत ?

सर्जिकल व्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रभावित अंडाशय किंवा दोन्ही अंडाशय काढून टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर केमोथेरपी आहेत. दुसरा कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी औषधे वापरतो. गर्भाशयाच्या कर्करोगांपैकी सुमारे २० ते २५ टक्के कर्करोग अनुवांशिक असतात. स्तनाचा किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, महिलेने सावधगिरी बाळगली पाहिजे.

हेही वाचा >> Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड, तर मदत करतील ‘ही’ योगासनं; पाहा करण्याची योग्य पद्धत

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो ?

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या तक्रारी आणि संबंधित उपचार सुरु असलेल्या स्त्रियांना ते विकसित होण्याची शक्यता जास्त असते.

वेळीच तपासणी महत्त्वाची

गर्भाशयाचा कर्करोग खूप वेगाने विकसित आणि वाढू शकतो, म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञाच्या क्लिनिकमध्ये पेल्विक चाचणी आवश्यक आहे. नियमित तपासणी करा आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हे लक्षात घेतले पाहिजे की, ही लक्षणे वेगवेगळ्या आरोग्य समस्यांमुळेदेखील उद्भवू शकतात. तुम्हाला या लक्षणांबद्दल चिंता वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला उशीर करू नका. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान आणि उपचारांची निवड करा.